मोदी होणार का नवे शांतीदूत? भारतानं मध्यस्थी केली तर स्वागत - इराण

मोदी होणार का नवे शांतीदूत? भारतानं मध्यस्थी केली तर स्वागत - इराण

युद्धाची शक्यता टाळण्यासाठी भारताने मध्यस्थी केली तर इराण शांतता प्रक्रिया सुरू करायला तयार आहे, असं इराणचे भारतातले राजदूत डॉ. अली चेगेनी यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 जानेवारी : इराण आणि अमेरिकेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि युद्धाची शक्यता टाळण्यासाठी भारताने मध्यस्थी केली तर इराण शांतता प्रक्रिया सुरू करायला तयार आहे, असं इराणचे भारतातले राजदूत डॉ. अली चेगेनी यांनी म्हटलं आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इराणच्या राज्यकर्त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. जागतिक शांततेसाठी भारताची नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे, असंही डॉ. चेगेनी यांनी म्हटलं आहे.

इराणने इराकमधल्या अमेरिकेच्या बेसवर मिसाइल हल्ला केल्यानंतर काही तासांनी इराणी राजदूतांनी भारताच्या मध्यस्थीबद्दल टिप्पणी केली आहे. "भारत हे मित्रराष्ट्र आहे. त्यांनी शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांचं आम्ही स्वागतच करू. तणाव कमी करण्यास कोणत्याही देशाने तसे प्रयत्न केले, तरी आम्ही प्रतिसाद देऊ. भारत तर या क्षेत्रातच येतो आणि शांतताप्रिय देश आहे. आम्हालाही युद्ध नको आहे", असं डॉ. चेगेनी म्हणाले.

संबंधित - इराणने 12 क्षेपणास्त्रे डागली तरी काहीच नुकसान नाही, अमेरिकेनं असं काय केलं?

इराणने इराकमधले अमेरिन बेस उद्ध्वस्त केले. त्याविषयी बोताना चेगेनी म्हणाले, "अमेरिकेने जनरल कासिम सुलेमानी यांच्यावर हल्ला केला, त्याची ही प्रतिक्रिया होती. सुलेमानी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी लाखो लोक जमले होते. त्यांची ही मागणी होती. आम्ही ते काम पूर्ण केलं आहे. युद्धाची सुरुवात म्हणून हे केलेलं नाही."

सुलेमानी यांच्या हत्येनंतर सांत्वन करायला भारतीय अधिकारी पोहोचले नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेनं सुलेमानींन का मारलं? असं विचारताना ते म्हणाले, "जगातल्या त्या लोकांपैकी एक होते, ज्यांनी ISIS चा धोका कमी केला. तुम्ही सुलेमानींची हत्या करता, म्हणजे तुमचं त्या दहशतवाद्यांना समर्थन आहे का? जनरल सुलेमानींनी आयसिसविरोधात कारवाई केली नसती तर भारत, युरोप आणि संपूर्ण जगाचं काय झालं असतं?"

-----------------------

अन्य बातम्या

अशोक चव्हाणांनी बापलेकीचा शेअर केलेल्या व्हिडिओचा लागला शोध

पुणेकरांनो सावधान, नव्या 'सायबर' गुन्हेगारांच्या टार्गेटवर आहे शहर

Aadhaar मध्ये मोबाइल नंबर आणि ई मेलचं व्हेरिफिकेशन झालं सोपं, या अ‍ॅपने होईल काम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: iran
First Published: Jan 8, 2020 07:48 PM IST

ताज्या बातम्या