इराकमधील अमेरिकेच्या एअरबेसवर 4 रॉकेटचे हल्ले

इराकमधील अमेरिकेच्या एअरबेसवर 4 रॉकेटचे हल्ले

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही

  • Share this:

बगदाद, 21 जानेवारी : इराण आणि अमेरिकेत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिका दूतावासाजवळ पुन्हा रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. मोठी सुरक्षितता असणाऱ्या अमेरिकेच्या दूतावासाजवळ 3 रॉकेट हल्ले करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अद्याप तरी कोणीच या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

इराकमधील अमेरिकेच्या एअरबेसवर 4 रॉकेटचा हल्ला

यापूर्वी बगदादपासून उत्तरेकडे असलेल्या इराकमधील अमेरिकेच्या एका एअरबेसवर चार रॉकेटचा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये इराकचे चार पायलट जखमी झाले होते. सुरक्षा दलांनी चार पायलट जखमी झाल्याची माहिती देण्यात आली असून त्यांनी सांगितलं की, गेल्या दोन आठवड्यात अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अल-बलाद एअरबेसवर तैनात असलेले अमेरिकन पायलट आधीच तिथून गेले होते.

अमेरिकेने एका हवाइ हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर जनरल कासिम सुलेमानीला मारलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी महदी यांनी वक्तव्य केलं होतं. बगदादमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचल्यानंतर सुलेमानी यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

सुलेमानी ठार झाल्यानंतर इराणने याचा बदला घेऊ असा इशारा दिला होता. त्यानंतर अमेरिकेच्या दुतावासावर आणि लष्करी तळांवर इराणने हल्ले केले. या हल्ल्यावेळी इराणकडून युक्रेनचं विमानही पाडलं गेलं. यात 176 प्रवाशांना प्राण गमवावे लागले.

First published: January 21, 2020, 9:13 AM IST

ताज्या बातम्या