प्रेमाची भयंकर शिक्षा! वडिलांकडून 14 वर्षांच्या मुलीची गळा चिरून हत्या

प्रेमाची भयंकर शिक्षा! वडिलांकडून 14 वर्षांच्या मुलीची गळा चिरून हत्या

14 वर्षीय रोमिना अशरफी गेल्या महिन्यात आपल्या 35 वर्षीय प्रियकरासह घरातून पळून गेली आणि तिनं लग्न केलं.

  • Share this:

तेहरान, 28 मे : घरच्यांचा विरोध असल्यानं प्रेमात असलेली 14 वर्षांची युवती घरातून पळून गेली. वडिलांनी हा राग डोक्यात ठेवून मुलीची निर्घृण हत्या केली आहे. प्रेमाची एवढी मोठी शिक्षा आपल्या मुलीला दिली की गळा चिरून तिची हत्या केली. संपूर्ण देश कोरोनाविरुद्ध लढा देत असताना हा थरारक ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे.

उत्तर इराणमध्ये मुलीच्या प्रेम प्रकरणाचा राग वडिलांच्या डोक्यात गेला आणि त्यांनी हत्या केली. या संपूर्ण प्रकरणात इराण पोलिसांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. इराणमधील सोशल मीडियावर या विषयावर बराच संताप व्यक्त होत असून पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी वडिलांना अटक केली तरी 3 वर्ष शिक्षा पूर्ण करून ते पुन्हा सुटू शकतात त्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

इराणमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गिलान इथे राहणारी 14 वर्षीय रोमिना अशरफी गेल्या महिन्यात आपल्या 35 वर्षीय प्रियकरासह घरातून पळून गेली आणि तिनं लग्न केलं. रोमिनाच्या वडिलांनी या प्रकरणी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी रोमिना आणि तिच्या प्रियकराला पकडलं. रोमिनाला वडिलांच्या हवाली केलं त्यांनंतर वडिलांनी मुलीला घरात कोंडून ठेवलं.

हे वाचा-कोव्हिड-19 रुग्णालयालाच लागली भीषण आग, 5 कोरोना रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू

रोमिनानं आपल्या जीवाला धोका असल्याची दिली होती माहिती

मिळालेल्या माहितीनुसार रोमिनाने वडिलांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. पोलिसांना ही माहिती देऊनही पोलिसांनी वडिलांच्या हवाली मुलीला केलं. मागच्या आठवड्यात रात्री रोमिना झोपली असताना वडिलांनी तिची गळा चिरून निर्घृण हत्या केली. आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली देत वडिलांनी पोलिसांना सरेंडर केलं.

हे वाचा-कोरोनाचा कहर सुरूच, मृतांच्या आकड्यांमध्ये चीनलाही मागे टाकणार भारत?

हे वाचा-TikTok शी स्पर्धा करण्यासाठी भारतीयाने बनवलं Mitron अ‍ॅप, रेटिंगमध्ये टाकलं मागे

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 28, 2020, 10:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading