चोराची आयडियाची कल्पना, चक्क पोटाला बांधले 102 आयफोन

तीनं हे फोन आपल्या पोटाला बांधून घेऊन चालली होती. पोलिसांनी या महिलेला हाँगकाँगच्या शेन्ज़ेन या शहरात प्रवेश करताना अटक केली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2017 11:18 PM IST

चोराची आयडियाची कल्पना, चक्क पोटाला बांधले 102 आयफोन

20 जुलै : चोर काय चोरी करेल या नेम नाही. आणि त्याहून भयंकर म्हणजे चोरीसाठी काय शक्कल लढवले याचा भरोसा नाही. चीनमध्ये अशाच एका चोर महिलेनं पोटाला आयफोन लावून चोरी केली. बरं ही चोरी थोडी थोडकी नाहीतर तब्बल 102 आयफोनची चोरी होती.

'द टेलिग्राफ' च्या रिपोर्टनुसार तीनं हे फोन आपल्या पोटाला बांधून घेऊन चालली होती. पोलिसांनी या महिलेला हाँगकाँगच्या शेन्ज़ेन या शहरात प्रवेश करताना अटक केली.

अधिकाऱ्यांच्या मते या महिलेनं तिच्या पोटाभोवती एक प्लास्टिकचं आवरण तयार केलं होतं आणि त्यात तिने आयफोन लपवले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी त्या महिलेकडून 15 लग्जरीअस् गाड्यादेखील जप्त केल्या आहेत.  

कसं पकडलं या महिलेला ?

उन्हाळ्याच्या वातावरणात या महिलेने अंगावर खूप कपडे घातले होते यावरून पोलिसांना या महिलेवर शंका आली आणि त्यांनी तिची चौकशी केली.  खूप सारे कपडे घातले असल्याने ती जाडजूडही दिसत होती. खरंतर हाँगकाँगमध्ये चीनपेक्षा स्वस्त आयफोन मिळतात. 'द वर्ज' च्या रिपोर्टनुसार टॅक्समुळे चीनमध्ये आयफोनची किंमत जास्त आहे आणि यात जर आयफोनची चोरी करून ते चीनमध्ये विकले तर त्याचा खूप फायदा आहे.

Loading...

102 आयफोनचं एकूण वजन 20 किलो

पोलिसांच्या माहितीनुसार, या आयफोनचं वजन 20 किलो इतकं होतं. आयफोनच्या या वाढत्या किंमतींमुळे फोनच्या चोऱ्या वाढतायत. 2015 मध्ये चीनमधून पोलिसांनी 94 आयफोन चोरणाऱ्या चोरांना अटक केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2017 11:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...