खोटारड्यांना संधी नाही! नोकरी देताना खरेपणा ओळखण्यासाठी Elon Musk विचारतात असा प्रश्न

खोटारड्यांना संधी नाही! नोकरी देताना खरेपणा ओळखण्यासाठी Elon Musk विचारतात असा प्रश्न

जगातील सर्वात यशस्वी व्यक्तींपैकी एक असणारे, टेस्ला (Tesla) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या यशात कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे आणि या कर्मचाऱ्यांची अचूक पारख करण्याची मस्क यांची हातोटी विलक्षण आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जानेवारी: जगातील सर्वात यशस्वी व्यक्तींपैकी एक असणारे, टेस्ला (Tesla) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या यशात कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे आणि या कर्मचाऱ्यांची अचूक पारख करण्याची मस्क यांची हातोटी विलक्षण आहे. केवळ एका प्रश्नावरून ते मुलाखतीला (Interview) आलेल्या उमेदवाराची (Candidate) पारख करतात. सीएनबीसीने एका अहवालात याबाबत सांगितले आहे. एका प्रश्नावरून ते तो खरं सांगत आहे की खोटं हे जाणून घेतात आणि खरं बोलणाऱ्या योग्य उमेदवाराची निवड केली जाते. काय आहे हा लाखमोलाचा प्रश्न जो टेस्लामधील नोकरीची संधी खुली करतो, तेही मस्क यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

आपल्या कंपनीतील उमेदवाराच्या पात्रतेबाबत मस्क पूर्वीपासूनच मोकळेपणानं सांगत आले आहेत. मीडिया अहवालांच्या मते, त्यांच्या दृष्टीनं पद्व्यांपेक्षा त्या उमेदवाराला आपल्या विषयातील किती सखोल ज्ञान आहे, हे महत्त्वाचे आहे.  गेल्या वर्षी त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय-AI- Artificial Intelligence) तुकडीतील सदस्यांनी पीएचडी मिळवली आहे किंवा उच्च माध्यमिक शालेय शिक्षण तरी पूर्ण केलं आहे की नाही याचीही त्यांना गरज वाटत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयात सखोल ज्ञान असलेल्या कर्मचार्‍यांना त्यांचं प्राधान्य असेल, ते असेल तर तुम्हाला पदवीचीही आवश्यकता नाही, असं मस्क यांनी स्पष्ट केलं होतं. टेस्लाची कृत्रिम बुद्धीमत्ता तुकडी थेट मस्क यांना रिपोर्ट करते.

(हे वाचा-Work From Home: कोरोनानंतरही मोठ्या संख्येने कर्मचारी करणार घरूनच काम- रिपोर्ट)

जेव्हा रेझ्युमे (Resume) आणि नोकरीच्या मुलाखतीचा (Interview) प्रश्न येतो तेव्हा बरेचजण काही गोष्टींबाबत खोटे बोलतात. सीएनबीसीच्या अहवालानुसार, 40 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या 26 टक्के लोकांनी रेझ्युमेबाबत खोटं सांगितल्याचं कबूल केलं आहे. मस्क यांचा विश्वास आहे की त्याचा हा एक प्रश्न खोटं बोलणाऱ्या उमेदवारांना ओळखण्यास सहज मदत करू शकतो.

2017 मध्ये, एका जागतिक शिखर परिषदेत बोलताना मस्क यांनी हा प्रश्न सर्वांसमोर सांगितला होता. मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांना मस्क यांचा हा एकमेव प्रश्न असतो. तो म्हणजे ‘तुम्ही काम केलेल्या काही सर्वात कठीण समस्यांविषयी आणि तुम्ही त्यांचे निराकरण कसे केले हे सांगा.’

(हे वाचा-Sensex VS Gold: वाचा दोन्ही पर्यायांपैकी तुम्हाला कुठे मिळेल चांगला रिटर्न)

हा कोणताही ट्रिकी प्रश्नही नाही. अगदी साधा सरळ प्रश्न आहे. याबाबत मस्क यांचे तर्कशास्त्र अगदी सोपे आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, खरंच त्या उमेदवारानं अशा समस्यांचं निराकरण केलं असेल तर तो त्याबद्दल अगदी बारकाव्यांसह सविस्तर सांगू शकेल, मात्र कोणी फक्त मस्क यांना प्रभावित करण्यासाठी न केलेली गोष्ट सांगू पहात असेल तर ती समोरच्या व्यक्तीला पटेल अशा पद्धतीनं सांगता येणं शक्य नाही.

‘द कन्झर्वेशन’मधील एका लेखानुसार, मस्क यांची ही पद्धत वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाली आहे. जे लोक खरं सांगतात आणि जे खोटं बोलतात त्यांच्या वागण्यात फरक असतो, हे संशोधनातून स्पष्ट झालं आहे. यामध्ये लहानसहान बारकावे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. त्यावरून मुलाखत घेणाऱ्याला समोरची व्यक्ती खरं सांगत आहे की खोटं हे सहज ओळखता येतं. एखादी व्यक्ती खरं सांगत आहे, ती स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सर्व  तपशील सांगते, मात्र खोटेपणा करणाऱ्या व्यक्तीनं खरं सांगत असल्याचं भासवण्यासाठी अती तपशील देण्याचा प्रयत्न केला तर ते सहज ओळखता येतं.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 28, 2021, 4:21 PM IST
Tags: tesla

ताज्या बातम्या