मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अनेक सरकारी आणि देशी-विदेशी News Website अचानक झाल्या क्रॅश

अनेक सरकारी आणि देशी-विदेशी News Website अचानक झाल्या क्रॅश

साईट ओपन केल्यास 503 एरर येत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

साईट ओपन केल्यास 503 एरर येत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

साईट ओपन केल्यास 503 एरर येत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 8 जून : न्यूयॉर्क टाईम्स, द गार्डियन, सीएनएन इंटरनॅशनल, वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रिट जर्नल, टाईम्स मॅगझिन आणि बीबीसी सारख्या प्रमुख देशी-विदेशी बातम्यांच्या वेबसाईट्स क्रॅश झाल्याची माहिती मिळत आहे. परदेशी बातम्यांच्या या वेबसाईट्स भारतात ओपन नसल्याची समस्या येत आहे.

साईट ओपन केल्यास 503 एरर ‘503 Service Unavailable’ येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या याबाबत शोध सुरू असून, या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. गार्डियन यूके टेक्नोलॉजी एडिटर अलेक्स हर्न यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

अॅमेझॉन, यूके सरकार आणि रेड्डिट या संकेतस्थळांनाही या त्रासाचा सामना करावा लागला आहे. सामान्यपणे मेंटनन्ससाठी किंवा ओव्हरलोड झाल्याने सर्व्हर डाऊन झाला असल्याचं बोललं जात आहे. परंतु याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

First published: