अमेरिकेत शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना झटका, ट्रम्प लवकरच घेणार मोठा निर्णय

अमेरिकेत शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना झटका, ट्रम्प लवकरच घेणार मोठा निर्णय

सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना घरी परत पाठविण्याच्या योजनेवर अमेरिका सध्या विचार करीत आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 07 जुलै : कुवेतहून (Kuwait) 8 लाख भारतीयांना मायदेशी परत पाठवण्याची चर्चा सुरू असताना आता अमेरिकेतूनही (US) मोठी बातमी येत आहे. अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा झटका लागण्याची शक्यता आहे. सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना घरी परत पाठविण्याच्या योजनेवर अमेरिका सध्या विचार करीत आहे. अमेरिकेचा असा विश्वास आहे की जे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी ऑनलाईन क्लासद्वारे शिकत आहे, त्यांना अमेरिकेत राहण्याची गरज नाही. अमेरिकन प्रशासनाने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना लवकरात लवकर सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू करण्यास सांगितले आहे.

CNNने दिलेल्या वृत्तानुसार, इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंटने सोमवारी सांगितले की रिस्क ऑपरेशनचा भाग म्हणून अमेरिका या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात परत पाठविण्याची तयारी करीत आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लवकरच काही अभ्यासक्रम 'फक्त ऑनलाईन' स्वरूपात रुपांतरित केले जाऊ शकतात. अमेरिकन प्रशासनाच्या या निर्णयामुळे हजारो भारतीय विद्यार्थ्यांवर थेट परिणाम होणार आहे. अमेरिकेत, परदेशी विद्यार्थी मोठ्या संख्येने विद्यापीठांमध्ये, ट्रेनिंग प्रोग्राम आणि नॉन अकॅडमिक वोकेशनल प्रोग्राम शिकत आहेत.

वाचा-नरेंद्र मोदी सरकार चीनला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत, घेणार हा मोठा निर्णय

अनेक विद्यापीठांनी अभ्यासक्रम सुरू केले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या बऱ्याच मोठ्या विद्यापीठांनी आधीच ऑनलाईन अभ्यास करण्यास सुरवात केली आहे. हॉवर्डने आपले सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू केले आहेत आणि कॅम्पसमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता वर्गात जाण्याची गरज नाही. यानंतरच हॉवर्डमध्ये शिकणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांना परत पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मेक्सिकोहून हॉवर्ड येथे शिकवणारे प्रोफेसर वलेरिया मेंडोलिया म्हणतात की विद्यार्थ्यांना सक्तीने परत पाठवणे हा निर्णय त्रासदायक आहे. ते म्हणाले की, बरेच लोक अशा देशांचे आहेत जेथे त्यांच्या अभ्यासक्रमांनुसार शिक्षणाचे वातावरण नाही आणि तेथे ऑनलाईन पुरेशी मदत मिळणार नाही.

वाचा-मुलींना कोट्यधीश बनविणाऱ्या या योजनेत सरकारने दिली मोठी सवलत, जाणून घ्या नियम

असे असेल रिस्क ऑपरेशन

इमिग्रेशन विभागाने जाहीर केले आहे की खास व्हिसा असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्ग सुरू झाल्यानंतर अमेरिकेत राहण्याची आवश्यकता नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी अमेरिका प्रत्येक सत्रासाठी व्हिसा देणार नाही, त्यांनी घरी परत जावे सध्या अमेरिकेच्या बर्‍याच विद्यापीठांमध्ये ऑनलाईन आणि वैयक्तिकरित्या मिक्स कोर्स सुरू आहेत, याचा अर्थ विद्यार्थ्यास अभ्यासाच्या गरजेनुसार ऑनलाईन किंवा कॅम्पसमध्ये जाण्याचा पर्याय आहे.

भारतीय विद्यार्थ्यांना झटका

अमेरिकन प्रशासन सध्या पूर्णपणे शिक्षण ऑनलाइन करण्याचा आग्रह धरत आहे. अमेरिकन एज्युकेशन काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे उपाध्यक्ष ब्रॅड फॅन्सवर्थ यांनी सांगितले की सरकारचा निर्णय त्यांना अत्यंत धक्कादायक आहे. ते म्हणाले की, या निर्णयामुळे देशातील 1800 विद्यापीठांमधील शैक्षणिक कर्मचारी आणि मुलांसाठी संभ्रमाची परिस्थिती निर्माण होईल. या महाविद्यालये आणि विद्यापीठांनी विद्यार्थ्यांकडून फी घेतली आहे आणि त्यांना काही आश्वासने दिली आहेत, या सर्वांना कोरोना विषाणूच्या बहाण्याने नाकारले जाऊ शकत नाही.

वाचा-इन्स्टाग्रामवरून कसे कमावले जातात पैसे? या स्टार्सची आहे कोट्यवधींची कमाई

संपादन-प्रियांका गावडे.

Published by: Manoj Khandekar
First published: July 7, 2020, 7:59 AM IST
Tags:

ताज्या बातम्या