नेपाळमधल्या जानकी मंदिरात पंतप्रधान मोदींनी घेतलं दर्शन

पंतप्रधान मोदींनी नेपाळच्या जानकी मंदिरात दर्शन घेतलं.जनकपूर भागात हे प्रसिद्ध मंदिर आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 11, 2018 12:29 PM IST

नेपाळमधल्या जानकी मंदिरात पंतप्रधान मोदींनी घेतलं दर्शन

नेपाळ, 11 मे : पंतप्रधान मोदींनी नेपाळच्या जानकी मंदिरात दर्शन घेतलं.जनकपूर भागात हे प्रसिद्ध मंदिर आहे. मोदींचं स्वागत करण्यासाठी नेपाळचे संरक्षणमंत्री ईश्वर पोखरेल आणि प्रांत क्रमांक २ या राज्याचे मुख्यमंत्री लालबाबू राऊत उपस्थित होते.

या वर्षातली मोदींची ही तिसरी नेपाळ वारी आहे. तर नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली काही दिवसांपूर्वीच भारतात येऊन गेले.

भारत-नेपाळ संबंधांना सर्वात मोठा कंगोरा आहे तो चीनचा. एकीकडे भारत-नेपाळ संबंध तितकेसे चांगले नाहीयेत, आणि दुसरीकडे, चीन नेपाळवर विकास प्रकल्प, आर्थिक मदत आणि कमी व्याज्याच्या कर्जाचा वर्षाव करतोय. या पार्श्वभूमीवर नेपाळशी संबंध सुधारणे, हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक महत्त्वाचं धोरण बनलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2018 12:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close