Home /News /videsh /

अफगाणिस्तानच्या न्यूज रूममधील धक्कादायक दृश्य पाहून समजेल परिस्थिती; पाहा VIRAL VIDEO

अफगाणिस्तानच्या न्यूज रूममधील धक्कादायक दृश्य पाहून समजेल परिस्थिती; पाहा VIRAL VIDEO

तालिबानने अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर कित्येक नागरिकांनी शक्य त्या मार्गांनी देशाबाहेर पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याची सुरुवात अध्यक्ष अश्रफ घनी यांनी केली.

मुंबई, 30 ऑगस्ट-  मानवी जीवन हे विरोधाभासांनी भरलेलं आहे. त्याची वेगवेगळी उदाहरणं आपण नेहमी पाहत असतो किंवा स्वतःही अनुभवत असतो. असंच एक उदाहरण अफगाणिस्तानमध्ये नुकतंच घडलं आहे. अफगाणिस्तानमधल्या (Afghanistan) एका वृत्तनिवेदकाने (TV Anchor) टीव्हीवरून नागरिकांना आवाहन केलं, की नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तुम्ही म्हणाल, की यात काय वेगळं आहे! पण निवेदक हे सांगत असताना त्याच्या पाठीमागे तालिबानचे दहशतवादी (Talibani Militants) रायफल्स रोखून उभे होते. हे सगळं घडलं ते पीस (शांतता) स्टुडिओ नावाच्या टीव्ही चॅनेलवर. हा किती मोठा विरोधाभास आहे बरं! या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बीबीसीच्या अँकर आणि प्रतिनिधी याल्दा हकीम (Yalda Hakim) यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. तसंच, इटिलाट्रोझ (Etilaatroz) आणि काबूल नाऊ (Kabul Now) या अफगाणिस्तानातल्या वृत्तपत्रांचे प्रकाशक झाकी दर्याबी (Zaki Daryabi) यांनीही पीस स्टुडिओतल्या या प्रकाराचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ते संदर्भ घेऊन wionews.com ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. (हे वाचा: दहशतवाद्यानं बंदुकीनं उडवलं गायकाचं डोकं; तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा समो) या व्हिडिओत संबंधित वृत्तनिवेदक बातम्या वाचताना, तसंच एका तालिबानी नेत्याशी चर्चा करताना दिसत आहे. पीस स्टुडिओत (Peace Studio) सुरू असलेल्या या कार्यक्रमाचं नाव 'पर्दाझ्' असं असून, वृत्तनिवेदक स्थानिक पश्तो (Pashto) भाषेत बोलतो आहे. अश्रफ घनी यांचं सरकार पडलं असलं, तरी (Islamic Emirate) इस्लामिक अमिरातमधल्या (म्हणजे तालिबानच्या आधिपत्याखाली असलेलं अफगाणिस्तान) नागरिकांनी गटाला (तालिबानला) सहकार्य करावं आणि त्यांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन त्या वृत्तनिवेदकाने केलं आहे. हे तो बोलत असताना त्याच्याभोवती तालिबानच्या सशस्त्र दहशतवाद्यांचा गराडा असल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. (हे वाचा: Exclusive : तालिबानच्या म्होरक्यासोबत NEWS18 ची बातचीत, काय आहे भारताबाबतचं मत?) 'अफगाणिस्तानमधल्या टीव्हीवर आता राजकीय चर्चा अशा प्रकारे पार पडते,' अशी कॅप्शन याल्दा हकीम यांनी हा व्हिडिओसोबत ट्विट केली आहे. 'असले प्रकार इटिलाट्रोझकडून स्वीकारले जाणार नाहीत. असंच चालणार असेल, तर आम्ही आमचं काम थांबवू,' असं प्रकाशक झाकी दर्याबी यांनी फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तालिबानने अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर कित्येक नागरिकांनी शक्य त्या मार्गांनी देशाबाहेर पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याची सुरुवात अध्यक्ष अश्रफ घनी यांनी केली. ज्यांना बाहेर पळून जाता आलं नाही, ते अत्यंत भयभीत झालेले आहेत. महिलांवर निर्बंध आले आहेत. सामान्य नागरिकांचं जगणंही कठीण झालं आहे. त्यात आता टीव्ही चॅनेलवरचा असा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याने तिथल्या माध्यमांची आणि पत्रकारांची स्थिती काय झाली, हेही जगासमोर आलं आहे.
First published:

Tags: Afghanistan, Taliban

पुढील बातम्या