कुलभूषण जाधव प्रकरणी 15 मेला होणार सुनावणी

कुलभूषण जाधव प्रकरणी 15 मेला होणार सुनावणी

  • Share this:

11 मे : हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मंगळवारी मोठा दिलासा दिला होता. आता या प्रकरणी पुढील सुनावणी आता 15 मेला आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार आहे. पाकिस्तानने जाधव यांना 10 एप्रिलला फाशीची शिक्षा सुनावली होती.

पाकिस्तानने सुनावलेल्या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती . तसंच भारताला पाकिस्तानने कोणतीही माहिती न देता बेकायदशीरपणे फाशीची शिक्षा सुनावली, असा दावाही भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केला होता. त्यानंतर न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली. न्यायालयांच्या या निर्णयामुळे जाधव यांच्या मुक्ततेसाठी पाकिस्तानवर दबाव आणणं शक्य होणार आहे.

दरम्यान, पुढील सुनावणीदरम्यान पाकिस्तान काय भूमिका मांडणार, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

First published: May 11, 2017, 11:38 AM IST

ताज्या बातम्या