भारताने खरी बाजू लपवली, पाकची आदळआपट सुरूच

कुलभूषण जाधव गुप्तहेर असल्याचा सबळ पुरावा कोर्टात सादर करणार असा पवित्राच पाकने घेतलाय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 18, 2017 08:36 PM IST

भारताने खरी बाजू लपवली, पाकची आदळआपट सुरूच

18 मे : कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात पितळं उघडं पडल्यामुळे पाकिस्तानचे चांगलेच धाबे दणाणले आहे. भारतानेच खरी बाजू दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोपच पाकिस्तानने केलाय.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर असल्याचा ठपका ठेऊन पाकिस्तानने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. या विरोधात भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकची पोलखोल केली. आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण यांच्या फाशीवर स्थगिती आणल्यामुळे पाकने पराभवाचं खापर भारतावर फोडलंय.

भारताने या प्रकरणात खरा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केलाय असा आरोपच पाकने केला. एवढंच नाहीतर कुलभूषण जाधव गुप्तहेर असल्याचा सबळ पुरावा कोर्टात सादर करणार असा पवित्राच पाकने घेतलाय.

पाकिस्तान काहीही म्हणत असला तरी त्याला आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय मान्य करावाच लागणार आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागळे यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2017 08:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...