Home /News /videsh /

माझं बाळं...बाबाही धावले; अचानक 29 व्या मजल्यावरुन खाली पडला चिमुरडा अन् जागीच मृत्यू!

माझं बाळं...बाबाही धावले; अचानक 29 व्या मजल्यावरुन खाली पडला चिमुरडा अन् जागीच मृत्यू!

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

मुलाला त्या अवस्थेत पाहताच वडीलही धावले..परंतू...

    नवी दिल्ली, 3 जुलै : तीन वर्षांच्या एका चिमुरड्याचा 29 व्या मजल्यावरुन पडल्यानंतर दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आई-वडिलांच्या डोळ्यासमोर मुलगा इमारतीवरुन खाली पडला. अपघातानंतर आईदेखील धायमोकलून रडू लागली. या घटनेमुळे लोकांमध्येही भीती पसरली आहे. द मिररने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील (America News) न्यूयॉर्क शहरात हा अपघात घडला. येथे तीन वर्षांचा एक मुलगा 29 व्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडला. तातडीने मुलाला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हे पाहून आईलादेखील धक्का बसला. दोघेही रडू लागले. वडिलांनी केला होता वाचवण्याचा प्रयत्न... रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, वडिलांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते मुलाला वाचवू शकले नाही. मुलाला बाल्कनीत पाहून वडील त्या दिशेने धावले. मात्र तोपर्यंत चिमुरडा 29 व्या मजल्यावरुन खाली पडला होता. अपार्टमेंटच्या खाली राहणाऱ्यांनी सांगितलं की, वरुन काहीतरी खाली पडत असल्याचं दिसलं. त्यांना वाटलं काही काम सुरू असेल. मात्र काही वेळानंतर आरडाओरडा ऐकू आला. पाहिलं तर एक मुलगा जमिनीवर पडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, शेजारच्यांनी सांगितलं की, या अपघातापूर्वी पती-पत्नीमध्ये भांडण झालं होतं. त्यांनी भांडणाचा आवाज ऐकला होता.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: America, Crime news

    पुढील बातम्या