Home /News /videsh /

प्रचंड महागाई, निरस लग्न आणि बॉलिवूड सिनेमांवर बंदी, तालिबानच्या राज्यात जगणं झालंय बोअरिंग

प्रचंड महागाई, निरस लग्न आणि बॉलिवूड सिनेमांवर बंदी, तालिबानच्या राज्यात जगणं झालंय बोअरिंग

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या (Citizens) आयुष्यातून रसच निघून गेला आहे.

    काबुल, 13 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या (Citizens) आयुष्यातून रसच निघून गेला आहे. तालिबाननं लादलेल्या भयंकर अटींमुळे सामान्य माणसांना अत्यंत बोअरिंग आणि कटकटीचं आयुष्य जगावं लागत असल्याचं चित्र आहे. एकीकडे वाढत चाललेली महागाई आणि दुसरीकडे एकामागून एका गोष्टीवर येत चाललेली बंदी अशा दुहेरी कात्रीत सर्वसामान्य अफगाणी जनता अडकली आहे. गाण्यांवर बंदी शरिया कायद्यानुसार संगीत ऐकणे पाप आहे, असं सांगत तालिबाननं सर्व टीव्ही, रेडिओ आणि संगीताच्या दुकानांवर बंदी घातली आहे. अनेक तरुण त्यांच्या आवडीची गाणी सायबर कॅफेतून मोबाईलमध्ये भरून आणत होते. मात्र तालिबान्यांच्या दहशतीमुळे आता तरुण कॅफेकडे फिरकतही नसल्याचं चित्र आहे. अनेक सायबर कॅफेमध्ये तालिबानींनी हल्ले करत तिथल्या साहित्याची तोडफोड केली आहे. बॉलिवूडवर बंदी अफगाणिस्तानमध्ये संगीत ऐकण्याबरोबरच बॉलिवूडच्या चित्रपटांवरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील लग्नांमध्ये करायचं काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. डान्स करणे, गाणी वाजवणे आणि सिनेमे पाहणे या गोष्टींवर तालिबानने बंदी घातल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लग्नं बोअरिंग होत असल्याची प्रतिक्रिया अफगाणिस्तानातील नागरिक देत आहेत. आतापर्यंत बॉलिवूडची अनेक गाणी लग्नांमध्ये वाजवली जात होती. टीव्हीवर केवळ तालिबानच्या बातम्या टीव्हीवर आतापर्यंत वेगवेगळ्या मालिका, चित्रपट आणि सांस्कृतिक कार्यक्रम दाखवले जात होते. तालिबानची सत्ता आल्यानंतर मात्र आता फक्त तालिबानचं समर्थन करणाऱ्या बातम्या  आणि धार्मिक कार्यक्रमच दाखवले जात आहेत. हे वाचा - स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'कू'(Koo) मध्ये होणार मोठी भरती, वाचा सर्व माहिती महागाईचा कळस एकीकडे नागरिकांचं आयुष्य निरस होत असताना दुसरीकडे महागाईने कळस गाठायला सुरुवात केली आहे. तेल, दूध, तांदूळ यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ज्या वस्तू खरेदी करण्यासाठी पूर्वी 1500 अफगाणी मुद्रा लागायच्या, तिथे आता 2200 ते 2500 मुद्रा मोजाव्या लागत असल्याचं चित्र आहे. एकीकडे महागाईचा मार आणि दुसरीकडे तालिबानचा मार अशा दुहेरी कात्रीत सध्या जनता अडकली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, Bollywood, Taliban

    पुढील बातम्या