Elec-widget

Indonesia Plain Crash : अपघातग्रस्त विमान चालवणाऱ्या भारतीय पायलटला देशात परतायचं होतं...

Indonesia Plain Crash : अपघातग्रस्त विमान चालवणाऱ्या भारतीय पायलटला देशात परतायचं होतं...

इंडोनेशियात लायन एअरलाईन्सला झालेल्या अपघातात १८८ प्रवाशांचा जीव जाण्याची शक्यता आहे. या विमानाचं सारथ्य कॅप्टन भव्य सुनेजा हा मुळचा भारतीय वैमानिक करत होता, असं आता स्पष्ट होतंय. पायलटसह प्रवाशांचा शोध जावा समुद्रात सुरू आहे.

  • Share this:

इंडोनेशियात झालेल्या विमान अपघातात १८८ प्रवाशांचा बळी जाण्याची शक्यता आहे. या विमानाचं सारथ्य कॅप्टन भाव्ये सुनेजा हा मुळचा भारतीय वैमानिक करत होता, असं आता स्पष्ट होतंय.

इंडोनेशियात झालेल्या विमान अपघातात १८८ प्रवाशांचा बळी जाण्याची शक्यता आहे. या विमानाचं सारथ्य कॅप्टन भव्य सुनेजा हा मुळचा भारतीय वैमानिक करत होता, असं आता स्पष्ट होतंय. पायलटसह प्रवाशांचा शोध जावा समुद्रात सुरू आहे.

लायन एअर या इंडोनेशियातल्या लो कॉस्ट एअरलाईन्सचं विमान जकार्ताहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमान समुद्रात कोसळलं. एयर ट्रॅफिक कंट्रोल रूमशी या विमानाचा संपर्क तुटला.

लायन एअर या इंडोनेशियातल्या लो कॉस्ट एअरलाईन्सचं विमान जकार्ताहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमान समुद्रात कोसळलं. एयर ट्रॅफिक कंट्रोल रूमशी या विमानाचा संपर्क तुटला. या विमानात १८८ प्रवासी होते.

लायन एअरलाईन्स या विमान कंपनीच्या इतिहासात काही छोटे- मोठे अपघात आणि प्रसंग याआधीही झालेले आहेत. पण कॅप्टन सुनेजा यांनी वैमानिक म्हणून कधीही कोणताही अपघात केलेला नव्हता. त्यांच्या विमानात असे धोकादायक प्रसंगही कधी उद्भवलेले नव्हते.

लायन एअरलाईन्स या विमान कंपनीच्या इतिहासात काही छोटे- मोठे अपघात आणि प्रसंग याआधीही झालेले आहेत. पण कॅप्टन सुनेजा यांनी वैमानिक म्हणून कधीही कोणताही अपघात केलेला नव्हता. त्यांच्या विमानात असे धोकादायक प्रसंगही कधी उद्भवलेले नव्हते. कॅप्टन भव्य सुनेजा हा वैमानिक मुळचा दिल्लीचा असून मार्च २०११मध्ये त्यानं इंडोनेशियाची लायन एअरलाईन्स ही कंपनी जॉईन केली. तो लवकरच ही नोकरी आणि इंडोनेशिया सोडून भारतात परतण्याचा विचार करत होता. पण त्याआधीच त्याच्या विमानाचा हा मोठा अपघात झाला आहे.

भाव्ये यांचं शिक्षण दिल्लीच्या मयुर विहार भागात झालेलं होतं. ते तिथलेच रहिवासी होते आणि भारतातल्या एका विमान कंपनीत ते रुजू होणार होते, अशी माहिती काही माध्यमांनी दिली आहे.

भव्य यांचं शिक्षण दिल्लीच्या मयुर विहार भागात झालेलं होतं. ते तिथलेच रहिवासी होते आणि भारतातल्या एका विमान कंपनीत ते रुजू होणार होते, अशी माहिती काही माध्यमांनी दिली आहे.

लायन एअरलाईन्सच्या अपघातग्रस्त विमानात १७८ प्रवासी होते. त्यामध्ये २ छोटी बाळं आणि एक मुलगाही होते. याशिवाय २ वैमानिक आणि पाच फ्लाईट अटेंडंट अशी माणसं या विमानात होती. अद्याप कोणाचाही शोध लागलेला नाही.

Loading...

इंडोनेशियाच्या सुरक्षा आणि बचाव पथकाचे प्रवक्ते युसुफ लतिफ यांनी सांगितलं की, सकाळी ६.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ५ वाजता) या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि त्यानंतर विमान ३० ते ४० मीटर खोल समुद्रात कोसळलं. बांगका नावाच्या बेटाजवळ विमानाचे अवशेष शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांपैकी कुणी जिवंत असण्याची शक्यता धुसर आहे.

इंडोनेशिया या देशात वाहतुकीसाठी विमानसेवा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. कारण छोट्या छोट्या बेटांनी बनलेला देश आहे. भूकंप, त्सुनामी आणि असे विमान अपघात यामुळे इंडोनेशियाला गेल्या काही काळात अनेक अनेक दुर्घटनांचा सामना करावा लागला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2018 01:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...