VIDEO : बदलाच्या नादात संतप्त जमावाने घेतला 300 मगरींचा जीव

VIDEO : बदलाच्या नादात संतप्त जमावाने घेतला 300 मगरींचा जीव

संतप्त जमावानं एक दोन नाही तर चक्क 300 मगरींना ठार मारलंय.

  • Share this:

17 जुलै : इंडोनेशियामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. संतप्त जमावानं एक दोन नाही तर चक्क 300 मगरींना ठार मारलंय. इंडोनेशियाच्या सोरोंग जिल्ह्यात मगरीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळं मग लोकांमध्ये संतापाची लाट उसळली.

फार्म हाऊसमध्ये असलेल्या मगरींवर हातात चाकू, लाठ्या-काठ्या, कुऱ्हाड घेऊन मगरींवर हल्ला केला. लोकांचा संताप इतका होता की घटनास्थळी दाखल झालेले पोलिसही त्यांच्यासमोर हतबल झाले.

VIDEO : खड्ड्यांविरोधात मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदूण मनसेचं आंदोलन

न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या मते, 48 वर्षाच्या माणसाच्या मृत्यूचा बदला म्हणून गावतील लोकांनी अशा पद्धतीने जनावरांची हत्या केली आहे. हा माणूस जनावरांना चारा आणण्यासाठी गेला होता. पण त्यावर एका मगरीने हल्ला केला आणि त्यात त्याचा जीव गेला आहे. त्यातमुळे याचा बदला म्हणून गावकऱ्यांनी 1-2 नाही तर तब्बल 300 मगरींना मारलं आहे.

 

हेही वाचा...

मनुस्मृतीचा अभ्यास करून आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली-संभाजी भिडे

आंबा खाल्याने पुत्रप्राप्ती होतेच हे कोर्टात सिद्ध करेन-संभाजी भिडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2018 08:53 AM IST

ताज्या बातम्या