मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Indonesia Flight Missing: इंडोनेशिया विमान कोसळल्याचं प्रकरण, मलबा आणि मृतदेहाचे काही अंश सापडले

Indonesia Flight Missing: इंडोनेशिया विमान कोसळल्याचं प्रकरण, मलबा आणि मृतदेहाचे काही अंश सापडले

उड्डाण केल्याच्या चार मिनिटांच्या आत याचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) मधून संपर्क तुटला. आणि...

उड्डाण केल्याच्या चार मिनिटांच्या आत याचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) मधून संपर्क तुटला. आणि...

उड्डाण केल्याच्या चार मिनिटांच्या आत याचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) मधून संपर्क तुटला. आणि...

जकार्ता, 9 जानेवारी : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथून उड्डाण केलेलं विमान काही मिनिटांत गायब झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर विमान कोसळल्याची माहिती मिळाली होती. या विमानात 12 क्रू मेंबर्स आणि 62 प्रवासी होते. ज्या ठिकाणी दुर्घटना झाली तिथे मलबा आणि मृतदेहांचे काही अंश सापडले असून अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अजूनही शोधकार्य सुरू आहे.

जकार्तामधून श्रीविजया एयरलाइन्सच्या बेपत्ता झालेल्या विमानाबाबत धक्कादायक माहिती मिळाली होती. शनिवारी उड्डाण केलेलं हे विमान समुद्रात क्रॅश झाल्याचं सांगितलं जात आहे. ब्रिटेनच्या डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये सात मुलं, 6 क्रू मेंबर्ससोबत 62 जणं प्रवास करीत होते. एअरपोर्टमधून उड्डाण घेतल्यानंतर विमानाचा कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटला होता. (Indonesia's Sriwijaya Air plane is believed to have crashed )

समुद्रात काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा ढीग पाहायला मिळाला आहे. हा ढीग बेपत्ता झालेल्या विमानाचा आहे की नाही याची अधिकृत पृष्टी झालेली नाही. श्रीविजया एअरच्या बेपत्ता फ्लाइटचा नंबर SJ 182 होता. बोइंग 737-500 क्लासच्या या विमानाने जकार्तामधील सुकर्णो-हट्टा विमानतावरुन उड्डाण केलं होतं. उड्डाण केल्याच्या चार मिनिटांच्या आत याचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) मधून संपर्क तुटला. त्यावेळी विमान 10 हजार फूट उंच होतं. विमानावर लक्ष ठेवणारी वेबसाइट FlightRadar24 ने दिलेल्या माहितीनुसार त्यांना अचानकपणे विमान खाली येत असल्याचे संकेत मिळाले.

एअरपोर्टवर नातेवाईकांची गर्दी

फ्लाइट जकार्ताच्या सुकर्णो-हट्टो विमानतळापासून पॉन्टिआनाक शहराच्या एअरपोर्टसाठी निघाली होती. मात्र मध्येच बेपत्ता झाली. याची सूचना मिळताच जकार्ता आणि पॉन्टिआनाक एअरपोर्टवर प्रवाशांचे नातेवाईक पोहोचले. दोन्ही एअरपोर्टवर गोंधळ उडाला आहे.

प्रवासांहून अधिक जणांना घेऊन जाणारं इंडोनेशियाचं विमान राजधानी जकार्तामधील (Jakarta) विमानतळावहून उड्डाण केल्यानंतर बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.  (Indonesia's Sriwijaya Air plane is believed to have crashed ) श्रीविजय एअर फ्लाइट 737 (The Sriwijaya Air Boeing 737) मध्ये तब्बल 59 प्रवासी आहेत. बेपत्ता झाल्यानंतर बराच वेळ विमानाच्या लोकेशनची माहिती मिळत नव्हती. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24.com यांनी दिलेल्या माहितीनुसार एका मिनिटांपेक्षा कमी कालावधीत विमानाने 10000 फूट उंचीवर उड्डाण केलं. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण घेतल्यामुळे एक उड्डाण बेपत्ता असल्याची माहिती मिळताच सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

First published:

Tags: Breaking News