मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

चीनला मोठा धक्का! भारतानंतर आणखीन एक देश राफेल खरेदी करणार

चीनला मोठा धक्का! भारतानंतर आणखीन एक देश राफेल खरेदी करणार

फ्रान्सच्या (France) संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ले (Florence Parly) यांनी एका मुलाखतीत या कराराची पुष्टी दिली.  इंडोनेशियाबरोबर (Indonesia) 36 राफेल विमानांच्या (Rafale fighter jets agreement) विक्रीबाबत करार अंतिम झाला आहे.

  • Published by:  News18 Desk
फ्रान्स, 07 डिसेंबर : चीनच्या (China) आक्रमक सम्राज्यवादी धोरणांनी त्रस्त झालेला इंडोनेशिया (Indonesia) आता फ्रान्सकडून (france) राफेल लढाऊ विमानं (Rafale fighter jets) खरेदी करणार आहे. फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ले (Florence Parly) यांनी एका मुलाखतीत या कराराची पुष्टी दिली. त्यांनी सांगितले की इंडोनेशियाबरोबर 36 राफेल विमानांच्या विक्रीबाबत करार अंतिम झाला आहे. राफेल खरेदीबाबत  दोन्ही देशांमध्ये बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. या करारामुळे आता दक्षिण चीनी समुद्रात, ड्रॅगनच्या सम्राज्यवादी धोरणाला चाप बसणार आहे. चीनच्या साम्राज्यवादी धोरणाचा त्रास भारतासह इतर अनेक शेजारील देशांना होत आहे. भारत आणि चीनमध्ये डोकलाम आणि गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारामुळे दोन्ही देशांत बराच तणाव निर्माण झाला होता. आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी भारताने यापूर्वीच फ्रान्सकडून 36 राफेल विमानं खरेदी केली होती. आता चीनचा आणखी एक कडवा विरोधी देश इंडोनेशियानेही फ्रान्सकडून राफेल विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वाचा-भारताची 4 महिन्यांत पाचव्यांदा अ‍ॅपबंदी; 43 Chinese Apps ला भारतीय पर्याय? फ्रान्सच्या ला ट्रिब्यून फायनान्शियल वेबसाइटने यापूर्वी सौद्याची माहिती उघड केली होती. पण त्यांच्या अहवालात  36 ऐवजी 48 राफेल विमानं खरेदी करणार असल्याचा उल्लेख होता. त्यामध्ये असे लिहिले होते, की जकार्ता फ्रान्सबरोबर आपली संरक्षण ताकद वाढवण्यासाठी उत्सुक असून राफेल विमान खरेदी करार अंतिम टप्प्यात आहे. या अहवालात असंही नमूद करण्यात आलं होत, की  या वर्षाच्या अखेरीस राफेल विमान करारावर सहमती दर्शवली जाईल. फ्रान्स आणि इंडोनेशियात सामरिक संबंध नुकताच सुरू झाला आहे. 2019 मध्ये इंडोनेशिया आणि फ्रान्स यांच्यात H225M जातीचं एअरबस हेलिकॉप्टर खरेदी करार झाला होता. निक्केई एशिअनच्या रिव्हुनुसार,  इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री पार्बोवो सुबिआन्टो यांच्या ऑक्टोबरमधील पॅरिस दौर्‍यात या करारावर चर्चा झाली होती. हे वाचा-अखेर भारतासमोर झुकला चीन, 30 वर्षात पहिल्यांदाच केली या मालाची आयात दक्षिण चीनी समुद्रातील नातुना बेटावरुन चीन आणि इंडोनेशियामध्ये वाद आहे. सप्टेंबरमध्येच इंडोनेशियाने चिनी युद्धनौका याठिकाणी पाण्यात बुडवल्या होत्या. तेव्हापासून चीनने इंडोनेशियाभोवती चारीबाजुंनी घेराबंदी  केली होती. त्यामुळे दक्षिण चीनी समुद्रात चीनकडून होणारा वाढता धोका लक्षात घेत इंडोनेशिया सातत्याने आपले सैन्य मजबूत करत आहे.
First published:

पुढील बातम्या