मराठी बातम्या /बातम्या /विदेश /COVID-19: भारतातील कोरोनाचा स्ट्रेन जगातील 17 देशांमध्ये पसरला - WHO

COVID-19: भारतातील कोरोनाचा स्ट्रेन जगातील 17 देशांमध्ये पसरला - WHO

 डब्ल्यूएचओने B.1.617 ला कोरोनाचा नवीन व्हेरियंट म्हणून घोषित केलंय. मात्र, यामध्ये केवळ हलके म्युटेशन (mutation) झाले आहे.

डब्ल्यूएचओने B.1.617 ला कोरोनाचा नवीन व्हेरियंट म्हणून घोषित केलंय. मात्र, यामध्ये केवळ हलके म्युटेशन (mutation) झाले आहे.

डब्ल्यूएचओने B.1.617 ला कोरोनाचा नवीन व्हेरियंट म्हणून घोषित केलंय. मात्र, यामध्ये केवळ हलके म्युटेशन (mutation) झाले आहे.

  जिनिव्हा, 28 एप्रिल: भारतात दुसऱ्या लाटेत आढळलेला कोरोनाचा डबल म्युटंट व्हेरियंट (Covid19 virus double mutant varient) जगातील इतर 17 देशांमध्ये आढळला आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मंगळवारी म्हटलंय. भारतात आढळलेल्या या व्हेरियंटला B.1.617 असं नाव देण्यात आलंय. हा व्हेरियंट सर्वात आधी भारतात आढळला होता. त्यानंतर GISAID ओपन-अ‍ॅक्सेस डेटाबेस वर अपलोड केलेल्या 1,200 पेक्षा जास्त सिक्वेंसमध्ये हा 17 देशात पसरल्याची माहिती मिळाली आहे.

  डब्लूएचओच्या कोरोना संदर्भातील विकली अपडेटमध्ये याबद्दल माहिती दिलीए. 'भारत, यूनायटेड किंगडम, यूएसए आणि सिंगापूरमधून सर्वाधिक सिक्वेंस अपलोड केले गेले,' असंही यात सांगण्यात आलंय. नुकतंच डब्ल्यूएचओने B.1.617 ला कोरोनाचा नवीन व्हेरियंट म्हणून घोषित केलंय. मात्र, यामध्ये केवळ हलके म्युटेशन (mutation) झाले आहे. हा व्हेरिंयंट चिंताजनक असण्याबाबत काहीही सांगण्यात आलेलं नाही.

  डब्ल्यूएचओने म्हटलंयं की, GISAIDने केलेल्या सिक्वेंसिंगच्या आधारे भारतात इतर व्हेरियंट्सच्या तुलनेत B.1.617 मुळे होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे ट्रान्समिशन वेगाने वाढू शकतं. अनेक रिसर्चमध्ये असं दिसून आलंय की पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रसार खूप जास्त वेगाने झाला.

  वाचा: BREAKING: महाराष्ट्रात 1 मे पासून 18+ नागरिकांना लस मिळणार नाही

  दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यासाठी डब्ल्यूएचओने लोकांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच B.1.617 आणि कोरोनाच्या इतर व्हेरियंट्सचा लवकरात लवकर अभ्यास करण्याची गरज असल्याचंही डब्ल्यूएचओने म्हटलंय. भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या उच्चांक गाठत आहे. त्यामुळे येत्या काळात परिस्थिती गंभीर होऊ शकते, अशी चिंता WHOने वर्तवली आहे.

  सार्स-सीओव्ही 2 के बी. 1.617ला डबल म्युटंट तसेच भारतीय व्हेरियंट म्हटलं जातंय. यामुळे आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या महाराष्ट्र आणि दिल्ली सर्वाधिक संसर्ग असणारी राज्ये झाली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 3,60,960 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून 3293 रुग्ण दगावले आहे. तसेच 2,61,162 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या बाधितांच्या संख्येसह देशातील एकूण रुग्णसंख्या 1,79,97,267 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 1,48,17,371 रुग्ण बरे झाले असून मृतांची संख्या 2,01,187 झाली आहे. तर देशात सध्या 29,78,709 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे वृत्त एएनआयने दिलं आहे.

  First published:

  Tags: Coronavirus, India, Who