S M L

परदेशातून भारतात पैसे पाठवण्यात भारतीय पहिल्या क्रमांकावर!

या वर्षी परदेशात असलेल्या भारतीयांनी आपल्या देशात 80 अब्ज डाॅलर भारतात पाठवले आहेत

News18 Lokmat | Updated On: Dec 8, 2018 09:44 PM IST

परदेशातून भारतात पैसे पाठवण्यात भारतीय पहिल्या क्रमांकावर!

08 डिसेंबर : परदेशामधून भारतात पैसे पाठवण्यात भारतीय पहिला क्रमांकावर आहे. भारतीय आपले पैसे परदेशात गुंतवण्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचं स्थान यंदाही कायम राखलं आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार, या वर्षी परदेशात असलेल्या भारतीयांनी आपल्या देशात 80 अब्ज डाॅलर भारतात पाठवले आहेत. यात चीनचा दुसरा क्रमांक लागला आहे.

चीनचे नागरिकांनी आपल्या देशात परदेशातून 67 अब्ज डॉलर रूपये पाठवले. भारत आणि चीनच्या नंतर मॅक्सिकोचा तिसरा क्रमांक लागला. मॅक्सिकोचे नागरिक हे 34 अब्ज डॉलर पाठवतात. फिलिपीन 34 अब्ज डॉलर आणि इजिप्तचे नागरिक 26 अब्ज डॉलर आपल्या देशात पाठवत असतात.

वर्ल्ड बँकेच्या 'माइग्रेशन अँड रेमिटेंस'च्या अहवालानुसार, पैसे साठवण्याच्या बाबतीत भारतीय सर्वात पुढे आहे. विकसनशील देशांना अधिकाधिक प्रमाणात पैसे पाठवण्यात 2018 मध्ये 10.8 टक्के वाढ झाली असून 528 अब्ज डॉलर इतकी रक्कम पाठवली जाते. मागील वर्षी हाच आकडा 7.8 टक्के होता. जगभरातून काळा पैसा यावेळी 10.3 टक्कांनी वाढून 689 अब्ज डॉलर इतका झाल्याची शक्यता आहे.


या अहवालात म्हटलं की, मागील 3 वर्षांत परदेशातून भारतात पाठवणाऱ्या पैशांची संख्या महत्त्वपूर्ण आहे.

2016 मध्ये 62.7 अब्ज डाॅलरहुन वाढून 2017 मध्ये 65.3 अब्ज डाॅलरपर्यंत पोहोचला. 2017 मध्ये परदेशात काळा पैसा पाठवण्याचा जीडीपी 2.7 टक्के वाटा होता.


Loading...

वर्ल्ड बँक म्हणते, विकसनशील देशात खास करून अमेरिकेतील मजबूत आर्थिक परिस्थिती आणि इंधनाच्या किंमतीत झालेली वाढीमुळे संयुक्त अरब अमिरात सारख्या देशात पैसे कमावण्यात मोठी वाढ झाली आहे. युएईमधून भारतात पैसे पाठवण्यात 2018 मध्ये गेल्या 6 महिन्यात 13 टक्के वाढ झाली आहे. बांग्लादेश आणि पाकिस्तानच्या नागरिकांनी आपल्या देशात पाठवलेल्या पैशात क्रमश:17.9 आणि 6.2 वाढ झाली आहे.

==============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2018 09:43 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close