जगाच्या कानाकोपऱ्यात राहणारा प्रत्येक भारतीय हा देशाचा दूत-पंतप्रधान मोदी

जगाच्या कानाकोपऱ्यात राहणारा प्रत्येक भारतीय हा देशाचा दूत-पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तीन देशांच्या दौऱ्यामध्ये अंतिम टप्प्यात नेदरलँडला पोहचले.

  • Share this:

27 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तीन देशांच्या दौऱ्यामध्ये अंतिम टप्प्यात नेदरलँडला पोहचले. यावेळी तिथे त्यांनी भारतीयांशी संवाद साधला. "जगाच्या कानाकोपऱ्यात राहणारा प्रत्येक भारतीय हा देशाचा दूत आहे" असे गौरवद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित भारतीयांनी मनं जिंकली.

पंतप्रधान मोदी भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री नेदरलँडमध्ये पोहचले. द हेगमध्ये त्यांनी भारतीयांशी संवाद साधला. आपल्या भाषणाची सुरुवात मोदींनी भोजपुरीतून केली. भाषणाच्या दरम्यान 'मोदी मोदी'च्या जयघोषाने सभागृह दणाणून गेलं.

प्रत्येक राष्ट्रामध्ये सरकारकडून भारतीय दुतावास असतो. दुतावासाला राजदूत म्हटलं जातं पण जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले भारतीय हेच खरे भारताचे दूत आहे असं यावेळी मोदी म्हणाले.

जेव्हा जेव्हा मी कोणत्याही देशाचा दौरा करतो तेव्हा तिथल्या नेत्यांशी भेट होते तेव्हा ते मला पाहतात. त्यांना वाटतं की, आम्हाला छोटासा देश चालवताना अनेक अडचणी येतात तुम्ही एवढा मोठा देश कसा चालवतात. पण मला त्यांना सांगावंस वाटतं, तुम्ही इथं देश चालवतात, पण माझ्या देशातील सव्वाशे कोटी भारतीय देश चालवतात असंही यावेळी मोदी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2017 11:11 PM IST

ताज्या बातम्या