मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

'एअरपोर्टवर शेजारी उभ्या माणसाला गोळी लागली'... भारतीय महिला पत्रकाराचा अफगाणिस्तानातून सुटकेचा थरार

'एअरपोर्टवर शेजारी उभ्या माणसाला गोळी लागली'... भारतीय महिला पत्रकाराचा अफगाणिस्तानातून सुटकेचा थरार

पत्रकार नयनिमा बासू यांची अखेर तालिबानी काबुलमधून सुटका झाली.

पत्रकार नयनिमा बासू यांची अखेर तालिबानी काबुलमधून सुटका झाली.

'युद्धग्रस्त अफगाणिस्तानात (War Torn Afghanistan) जाणं सुरक्षित नाही हे माहीत होतं, पण तिथून परत येण्यासाठी काय काय करावं लागेल, कुठली कौशल्य पणाला लागतील याची कल्पनाही नव्हती... ' नयनिमा बसू यांनी लिहिलेला थरारक अनुभव वाचून अंगावर काटा येईल.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट: तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केला, त्याच दिवशी त्या देशात रिपोर्टिंगसाठी गेलेल्या एका महिला पत्रकाराला भारतात परतायचं होतं. पण काबुल विमानतळावर मुंगीलाही शिरायला जागा नसेल एवढी गर्दी होती. गोळीबार सुरू होता. सगळं कौशल्य पणाला लावत या बेबंद वातावरणातून सहीसलामत बाहेर पडून भारतात परतणाऱ्या नयनिमा बसू यांनी लिहिलेला थरारक अनुभव वाचून अंगावर काटा येईल. नयनिमा यांनी द प्रिंटसाठी लिहिलेल्या लेखात 15 ऑगस्टच्या दिवशीचे अफगाणिस्तानचे अनुभव लिहिले आहेत. भारतीय दूतावासाच्या मदतीने त्या देशात परतल्या. 15 ऑगस्ट रोजी त्यांनी राजधानी काबूलवर (Kabul) ताबा मिळवला. त्या वेळी तिथे असलेल्या हजारो नागरिकांमध्ये नयनिमा बसू (Nayanima Basu) या भारतीय महिला पत्रकाराचाही समावेश होता. त्या सगळ्या गोंधळाच्या आणि अराजकाच्या वातावरणातून भारतात येण्याच्या भयानक अनुभवाबद्दल नयनिमा यांनी 'दी प्रिंट'मध्ये लेख लिहिला आहे. काबूलला जाणं धोकादायक होतं. परंतु, त्या युद्धसदृश स्थिती (War Torn Country) असलेल्या देशातून परत येण्यासाठी काय काय करावं लागेल, काय पाहावं लागेल याची मात्र कधी कल्पनाही केली नव्हती, असं त्या सांगतात. काबूल:तालिबाननं पुन्हा पाडला महिलेच्या रक्ताचा सडा; चिमुकल्यालाही केलं रक्तबंबाळ सोमवारी, 16 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता काबूलहून भारतात निघणार असलेल्या (Air India) एअर इंडियाच्या AI0244 या विमानातून नयनिमा बसू परत येणार होत्या. सोमवारी सकाळी लवकर जेव्हा त्या काबूल विमानतळावर पोहोचल्या, तेव्हा त्यांनी पाहिलं, की विमानतळ तालिबानने ताब्यात घेतलं आहे. तसंच, विमानतळाचं मुख्य प्रवेशद्वार 8-10 सशस्त्र वाहनांनी अडवलं असल्याचंही त्यांनी पाहिलं. प्रवाशांना विमानतळाच्या (Kabul Airport) मुख्य टर्मिनस इमारतीच्या बाहेर रस्त्यावर बसायला लावून तालिबान्यांकडून हवेत गोळीबार केला जात होता. VIDEO: महिला रिपोर्टरचा तो प्रश्न ऐकून हसू लागले तालिबानी, कॅमेरा केला बंद विमानतळाबाहेर हजारो जण विमान पकडण्यासाठी थांबलेले होते. अनेक अफगाणी कुटुंबं त्यांच्या लहान मुलांसह स्वतःचा बचाव करण्यासाठी तिथे बसलेली होती. त्यांच्यासोबत बसू यांनीही तिथे आश्रय घेतला. तालिबान्यांचा गोळीबार हवेत चालला असला, तरी त्यातल्या गोळ्या आपल्याला बसू नयेत, यासाठी चाललेली ती धडपड होती. सकाळी सात वाजता विमानतळाची प्रवेशद्वारं उघडण्यात आली आणि गर्दी आत जाण्यासाठी धडपडू लागली. गर्दी वाढल्यावर तालिबान्यांनी आपल्या गोळीबारातही वाढ केली. हवेत केल्या जाणाऱ्या गोळीबाराच्या (Firing) त्या आवाजाने सगळेच जण घाबरत होते. त्यातच काबूल विमानतळावरची सर्व विमानं रद्द करण्यात आल्याची माहिती समजली, असं बसू यांनी सांगितलं. अफगाणिस्तानबाहेर पळून जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांची संख्या वाढतच होती आणि विमानतळावर येणाऱ्यांची गर्दी वाढायला लागल्याबरोबर विमानतळावरचे तालिबानी चिडले आणि त्यांनी जमावावर अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. या सगळ्या अत्यंत बिकट परिस्थितीत भारतीय दूतावास (Indian Embassy) आणि दिल्लीतल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयातून नयनिमा यांना तीन पर्याय देण्यात आले होते. एक तर त्या ज्या हॉटेलमध्ये राहिल्या होत्या तिथे परत जावं किंवा विमानतळाच्या टेक्निकल एरियामध्ये जावं किंवा तिथल्या भारतीय दूतावासात जावं, असे ते तीन पर्याय होते. खरं की खोटं? तालिबानची सत्ता येताच अमेरिकी रिपोर्टरने पेहराव बदलला? 'मी बाहेर पडले, तेव्हा काही तालिबानी रक्षकांनी माझी तपासणी केली आणि ते माझ्या बॅग्ज जमिनीवर फेकून देणार होते. मी धीर राखून त्यांना सांगितलं, की मी भारतातून आलेली पत्रकार आहे आणि इथल्या परिस्थितीचं वार्तांकन करण्यासाठी आले आहे. असं सांगितल्यावर त्यांनी लगेचच मला मोकळं सोडलं,' असं नयनिमा यांनी सांगितलं. सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास विमानतळाबाहेरून मोठ्या जमावाने प्रवेशद्वार तोडून आत येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तालिबानी रक्षकांनी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार सुरू केला. त्यात नयनिमा यांच्या बाजूला उभ्या असलेल्या एका मनुष्याला गोळी लागली. या सगळ्या परिस्थितीतही नयनिमा यांनी कशीबशी सुटका करून घेतली आणि त्या विमानतळाबाहेर पडल्या. भारतीय दूतावासात जाण्यासाठी कॅब मिळवण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना पुन्हा तालिबान्यांनी अडवलं आणि तिथे प्रवेश नसल्याचं सांगितलं. तेव्हाही नयनिमा यांनी त्यांच्या म्होरक्याशी चर्चा करून त्याचं मन वळवण्यात यश मिळवलं आणि दूतावासात प्रवेश मिळवला. नयनिमा यांनी त्यांच्या लेखात लिहिलं आहे, 'दूतावासात प्रवेश मिळवण्यासाठी आधीच तिथे मोठी गर्दी झाली होती. एक महिला रडत माझ्यापाशी आली आणि तिने सांगितलं, की तिला तिच्या भावाला भेटण्यासाठी भारतात जायचं आहे. तिथे असलेल्या दोन मुलांनाही भारतात काम करण्यासाठी व्हिसा हवा होता.' नवीन सरकारमध्ये अफगाण महिलांना स्थान मिळणार का? तालिबानचा मोठा निर्णय दूतावास रिकामा करण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे नयनिमा आणि त्यांचे काही सहकारी पत्रकार, तसंच तिथे राहणारे काही नागरिक यांना बुलेटप्रूफ लँडक्रूझर गाड्यांमध्ये बसवून विमानतळावर नेण्यात आलं. त्यानंतर नयनिमा यांच्यासह अन्य भारतीयांनी अखेर (Indian Air Force) भारतीय हवाई दलाच्या C-17 ग्लोबमास्टर या विमानात प्रवेश केला. काबूलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टेक्निकल एरियामध्ये ते विमान पार्क केलेलं होतं. तेथे अमेरिकेचं सैन्य तैनात करण्यात आलेलं होतं. अखेरीस त्या विमानाने उड्डाण केलं आणि गुजरातमधल्या जामनगर इथे थोडा वेळ थांबून हे विमान मंगळवारी संध्याकाळी हिंडन हवाई तळावर उतरलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला, असं नयनिमा यांनी लिहिलं आहे.
First published:

Tags: Afghanistan, Taliban

पुढील बातम्या