मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

'आम्हाला वाचवा, नाहीतर आम्ही मारले जाऊ', युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची मोदींना साद

'आम्हाला वाचवा, नाहीतर आम्ही मारले जाऊ', युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची मोदींना साद

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये ते विद्यार्थी जीवाच्या आकांताने आपल्याला वाचवा, अशी भारत सरकारकडे विनवणी करत आहेत.

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये ते विद्यार्थी जीवाच्या आकांताने आपल्याला वाचवा, अशी भारत सरकारकडे विनवणी करत आहेत.

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये ते विद्यार्थी जीवाच्या आकांताने आपल्याला वाचवा, अशी भारत सरकारकडे विनवणी करत आहेत.

  • Published by:  Chetan Patil
सुमी (युक्रेन), 4 मार्च : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज नऊवा दिवस आहे. जसजसे दिवस पुढे जात आहेत तसतसं युद्ध आणखी भयानक होताना दिसत आहे. रशिया प्रचंड आक्रमक होताना दिसत आहे. रशियाकडून युक्रेनच्या मोठमोठ्या शहरांवर हल्ला केला जातोय. या युद्धात शेकडो युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील शेकडो विद्यार्थी आजही युर्केनमध्ये अडकले आहेत. भारत सरकारकडून भारतीय विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. भारत सरकारची त्यासाठी ऑपरशेन गंगा ही मोहीम सुरु आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत हजारो भारतीय नागरीक आणि विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात सरकारला यश आलं आहे. पण अद्यापही शेकडो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याचं चित्र आहे. कारण युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये ते विद्यार्थी जीवाच्या आकांताने आपल्याला वाचवा, अशी भारत सरकारकडे विनवणी करत आहेत. रशियाच्या सुपी शहरामध्ये 800 ते 900 भारतीय विद्यार्थी अद्यापही अडकलेले आहेत. तिथे त्यांच्या जेवणाची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना उपाशी राहावं लागत आहे. तसेच त्यांना पिण्यासाठी आणि शौचालयाला वापरण्यासाठी पाणी नाही. प्रत्येक अर्धा ते एक तासाला परिसरात मोठमोठ्या बॉम्बस्फोटाचा आवाज येतोय. त्यामुळे विद्यार्थी प्रचंड भेदरलेले आहेत. ते भारत सरकारकडे मदतीची याचना करत आहे. त्याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक तरुण विद्यार्थी शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्य उभा राहून आपल्या व्यथा मांडताना दिसतोय. विद्यार्थी नेमकं काय म्हणाला? "आमच्या चारही बाजूने धोका आहे. कुठून गोळीबार होईल, हल्ला किंवा एअर स्ट्राईक होईल याचा काहीच भरोसा नाही. प्रत्येक अर्धा तास आणि तासाभराच्या फरकाने इथे एअर स्ट्राईक होतोय. इथे प्रचंड थंडी आहे. उणे तापमान आहे. इतक्या थंड वातावरणात आम्ही इथून बाहेर कसं पडणार? एवढ्या साऱ्या मुली आहेत. हे आमचं तिसरं हॉस्टेल आहे. इतर मुलं आणखी बाकीच्या हॉस्टेलमध्ये बंदिस्त आहेत. आम्ही एकूण जवळपास 800 ते 900 भारतीय विद्यार्थी आहोत", असं व्हिडीओतला विद्यार्थी म्हणतोय. (आर्थिक निर्बंध लादल्यानंतरही रशियाची अर्थव्यवस्था इतकी मजबूत कशी?) "आम्ही भारतीय सरकारकडे सुरुवातीपासून मदतीसाठी विनंती करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतोय. आम्ही लोकं इथे मारले जाऊ. आमचा जीव जाईल. भारत सरकारला कृपया विनंती आहे, प्लीज आमची मदत करा. आम्ही किती विद्यार्थी आहोत. आमच्यासाठी लवकराच लवकर काहीतरी करा. आम्हाला रेस्क्यू करा. आमच्याजवळ खाण्यासाठी काहीच नाही. याशिवाय आमच्याकडे जेवण बनवण्यासाठी देखील काहीच नाही. आमच्याकडे पिण्यासाठी देखील पाणी नाही. आमच्याकडे टॉयलेटला जाण्यासाठी पाणी नाहीय. आम्ही खूप त्रस्त आहोत. काल रात्रीपासून आम्ही पाणी पिलेलं नाही. मी भारतीय सरकारला विनंती करतो, आम्हाला कृपया मदत करा. नाहीतर आम्ही इथे मारले जाऊ. प्लीज मोदीजी आम्हाला मदत करा", अशी विनंती विद्यार्थी करत आहेत.
First published:

पुढील बातम्या