हैदराबाद, 08 जुलै: 26 वर्षीय शरत कोपू, या भारतीय विद्यार्थ्याचा मिजोरीच्या कन्सास सीटी येथील एका रेस्टॉरन्टमध्ये चोरीच्या उद्दैशाने आलेल्या अज्ञात हल्लेखोराने गोळी झाडून हत्या केली. शरत हा मुळचा तेलंगणाचा असून तो शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. तो युनिव्हर्सिटी ऑफ मिजोरी- कन्सास सिटीमध्ये शिकत होता. शरतने हैदराबादमधून सॉफ्टवेअर इंजीनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर यावर्षी जानेवारीमध्ये तो अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी गेला होता. शिक्षण घेण्यासोबतच तो या रेस्टॉरंटमध्ये कामही करत होता. शरत याच्यावर 5 गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबाळीत जागीच त्याच्या मृत्यू झाला. सध्या पोलिसांच्या हाती त्या रेस्टारंटमधले सीसीटीव्ही फुटेज लागले असून. या फुटेजच्या माध्यमातून ते खुन्याचा शोध घेत आहेत. तसेच जी व्यक्ती या खुन्याबद्दल माहिती देणाऱ्याला पोलीस 10 हजार डॉलर्सचे बक्षिस देणार आहे.
हेही वाचा: मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी
हेही वाचा: वसई पूर्व- पश्चिम मार्ग जोडणारा अंबाडी ओव्हर ब्रिज बंद
शरतचा चुलत भाऊ संदीप वेमुलाकोंडाने या संपूर्ण घटनेबद्दल माहिती देताना म्हटले की, शरत रेस्टारंटमध्ये बसलेला असताना अचानक काही हल्लेखोरांनी रेस्टॉरंटमध्ये गोळीबार सुरू केला. या गोळीबारीत शरतला पाच गोळ्या लागल्या. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेय पण तेथे त्याला मृत घोषीत करण्यात आले. संदीपने भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. संदीप आणि शरतच्या संपूर्ण परिवाराला स्वराज यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे.
हेही वाचा: ...म्हणून दिल्ली- पुणे विमानाची इंदौरला करण्यात आली 'इमरजन्सी लँडिंग'26 वर्षीय विद्यार्थी
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा