विमानात दारू पिऊन धिंगाणा, भारतीय वंशाच्या महिलेला तुरुंगवास

किरण विमान प्रवास करण्याआधी सात ते आठ बिअर प्यायली होती. चार तासांच्या विमानप्रवासात सहा ग्लास वाईन प्यायली होती.

किरण विमान प्रवास करण्याआधी सात ते आठ बिअर प्यायली होती. चार तासांच्या विमानप्रवासात सहा ग्लास वाईन प्यायली होती.

  • Share this:
    24 नोव्हेंबर : विमानात दारू पिऊन धिंगाणा घातला म्हणून ब्रिटेनमध्ये भारतीय वंशाच्या एका महिलेला सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विमानात तिच्या या व्यवहारामुळे एका प्रवाशाला भोवळ आली होती. किरण जगदेवने या वर्षी जानेवारी महिन्यात स्पेनहुन ब्रिटेनला परत येत होती त्यावेळी तिने विमानात दारू दिली नाही असा आरोपही केला. न्यायाधीश फिलीप हेड यांनी सुनावणी दरम्यान तिचे आरोप फेटाळून लावले आणि सहा महिन्याची शिक्षा सुनावली. कोर्टात सांगण्यात आलं होतं की, विमानातून उतरत असताना किरणला त्रास होत होता. तेव्हा तिने ओरडून आम्ही सगळे मरायला चाललोय असं ओरडून सांगितलं. त्यामुळे एका प्रवाशाला याचा धक्का बसून त्रास झाला. सरकारी वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, किरणने विमान प्रवास करण्याआधी सात ते आठ बिअर प्यायली होती. चार तासांच्या विमानप्रवासात सहा ग्लास वाईन प्यायली होती. तिने विमानात आणखी दारू मागितली होती पण विमान कर्मचाऱ्यांनी नकार दिल्यावर स्वत:कडे असलेली दारू प्यायली. ती एवढ्यावरच थांबली नाही तिने विमानात कर्मचाऱ्यांसोबत हुज्जतही घातली. विमानतळावर उतरल्यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ==========================
    First published: