मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

ब्रिटनला मिळणार भारतीय वंशाचा पंतप्रधान! नारायण मूर्तींशी आहे जवळचं नातं

ब्रिटनला मिळणार भारतीय वंशाचा पंतप्रधान! नारायण मूर्तींशी आहे जवळचं नातं

ब्रिटनमधील सत्तारूढ पक्षानं पुढील पंतप्रधान (Britain Next PM) निवडीची औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये भारतीय वंशाच्या नेत्याचं नाव सर्वात आघाडीवर आहे.

ब्रिटनमधील सत्तारूढ पक्षानं पुढील पंतप्रधान (Britain Next PM) निवडीची औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये भारतीय वंशाच्या नेत्याचं नाव सर्वात आघाडीवर आहे.

ब्रिटनमधील सत्तारूढ पक्षानं पुढील पंतप्रधान (Britain Next PM) निवडीची औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये भारतीय वंशाच्या नेत्याचं नाव सर्वात आघाडीवर आहे.

  • Published by:  Onkar Danke
मुंबई, 10 जुलै : ब्रिटनमधील सत्तारूढ पक्षानं नवा नेता आणि देशाचा पुढील पंतप्रधान (Britain Next PM)  निवडीची औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक (Rishi Sunak) सर्वात आघाडीवर आहेत. सुनक हे इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावाई आहेत. हाऊस ऑफ कॉमन्समधील सत्तारूढ पक्षाचे नेते मार्क स्पेन्सर, माजी अध्यक्ष ओलिव्ह डाऊडेन आणि माजी कॅबिनेत मंत्री लियाम फॉक्ससह अनेक ज्येष्ठ खासदारांना सुनक यांना पाठिंबा दिला आहे. बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर विखुरलेल्या सत्तारूढ पक्षांच्या नेत्यांची एकजूट करण्यात आणि देशापुढील आर्थिक आव्हांनाचा सामना करण्यासाठी सुनक हे सर्वात सक्षम आहेत, असे या नेत्यांचे मत आहे. ब्रिटनचे संरक्षण मंत्री बेन बॉलेस यांनी या शर्यतीमधून माघार घेतल्यानं सूनक यांची दावेदारी आणखी भक्कम झाली आहे. ब्रिटीश वेबसाईट 'ऑडसेडर यूके' नं दिलेल्या वृत्तानुसार सट्टेबाजांचीही सुनक यांना पसंती आहे. पंतप्रधान निवडीस लागणार वेळ बोरिस जॉन्सन यांचा उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया हे वेळखाऊ असून ब्रिटनला नवा पंतप्रधान कधी मिळेल हे पुढील आठवड्यात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 'द डेली टेलिग्राफ' नं दिलेल्या वृत्तानुसार सत्तारूढ पक्षाचे 16 नेते पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यामुळे निवड प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. या निवडणुकीचे नियम आणि डेडलाईन निश्चित करण्याचं मोठं आव्हान पक्षाच्या समितीसमोर आहे. Video : श्रीलंका धगधगतंय! नागरिकांनी पंतप्रधानांच्या घरात घुसून लावली आग, गाड्यांचाही चुराडा ब्रिटीश मीडियातील वृत्तानुसार पंतप्रधानपदासाठी उत्सुक प्रत्येक उमेदवाराला 20 खासदारांच्या पाठिंब्याची अट ठेवली जाऊ शकते. त्यामुळे कमकुवत उमेदवार सुरूवातीलाच शर्यतीमधून बाहेर पडतील. मंगळवारपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असेल. या आठवड्याच्या शेवटी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होईल. त्यामध्ये शेवटच्या क्रमांकावर राहणारा उमेदवार शर्यतीमधून बाहेर पडेल. त्यानंतर 18 जुलैच्या आसपास विशेष समितीची बैठक होईल. ही समिती शर्यतीमध्ये आव्हान कायम असलेल्या सर्व उमेदवारांशी खासगीमध्ये चर्चा करेल. 21 जुलैपर्यंत शर्यतीमधील शेवटच्या दोन उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी त्यांना वेगवेगळ्या टप्प्यातील निवडणुकांना सामोरं जावं लागेल. त्यानंतर सत्तारूढ पक्षाचे दोन लाख उमेदवार अंतिम फेरीत दोघांपैकी एकाची निवड करतील. साधारण 5 सप्टेंबरपर्यंत ब्रिटनला नवा पंतप्रधान मिळण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Britain

पुढील बातम्या