रस्त्यावर का थुंकतोस म्हणून विचारला जाब; रागात त्याने खेळाडूला चाकूनंच भोसकलं

रस्त्यावर का थुंकतोस म्हणून विचारला जाब; रागात त्याने खेळाडूला चाकूनंच भोसकलं

रस्त्यावर थुंकण्यावरून वाद झाला आणि हा वाद इतका शिगेला पोहोचला की त्यात एकाचा जीव गेला.

  • Share this:

लंडन, 28 ऑक्टोबर : रस्त्यावर का थुंकतोस असं विचारल्यानंतर आपल्यालाच उलट उत्तरं देणाऱ्या अनेक व्यक्ती आपण पाहिल्या आहेत. थुंकण्यापासून रोखलं किंवा थुंकण्याचा जाब विचारला म्हणून अरेरावी केली जाते. मात्र यूकेत चक्क एका व्यक्तीला चाकूनंच भोसकलं आहे. रस्त्यावर का थुंकतोस असं विचारलं आणि थुंकण्यापासून थांबवलं म्हणून त्या व्यक्तीवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे, ज्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

मूळचा भारतीय असलेल्या गुरजीत सिंह लालने (Gurjeet Singh Lal) यूकेतील माजी रग्बी प्लेअर बिल्डर एलन आयजिचेवर चाकूनं हल्ला केला. एलन यांचा त्यात मृत्यू झाला. गुरजीतला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. 14 डिसेंबरला त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे.

ही घटना आहे, 24 ऑगस्ट 2019 ची. लंडनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी एलन आयजिचे संध्याकाळी एका पबमध्ये गेले होते. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ते पबमधून बाहेर पडले आणि घरी जायला निघाले. सेंट मेरी एव्हेन्यू साऊथमध्ये त्यांचं घर आहे, त्या दिशेनं ते जात होते. त्यावेळी साऊथ हॉलमधील रस्त्यावर त्यांनी गुरजीत सिंह लालला पाहिलं. तो रस्त्यावर थुंकत होता. यावरून एलन आणि गुरजीतचा वाद झाला. एलन आपल्या मार्गानं पुन्हा जायला निघाले तेव्हा गुरजीत पुन्हा रस्त्यावर थुंकला. पुन्हा दोघांमध्ये वाद पेटला. त्यावेळी गुरजीतनं अचानक आपल्याजवळील चाकू बाहेर काढला आणि एलन यांच्यावर वार केला.

हे वाचा - लग्न होईना म्हणून फिल्मी स्टाइल बदला; तरुणानं शेजाऱ्याच्या दुकानावर JCB चढवला

जखमी एलन रस्त्यावरच कोसळले. ते रक्तबंबाळ झाले होते. तसंच ते कसेबसे उठले आणि थोडं चालत जाऊन त्यांनी आपल्या शेजाऱ्याच्या दरवाजाची बेल वाजवली. शेजाऱ्यांकडे त्यांनी मदत मागितली. काही वेळात पोलीस आणि अॅम्ब्युलन्स तिथं दाखल झाली. रुग्णालयात पोहोचेपर्यंत एलन यांना प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच अॅम्ब्युलन्समध्येच त्याचा मृत्यू झाला.

हे वाचा - गर्लफ्रेंडच्या हत्येच्या आरोपात आजन्म कारावास; जेलमधूनच कमवतोय वर्षाला 8 लाख

गुरजीत आणि एलन यांच्यात हाणामारीत गुरजीतही जखमी झाला होता. पोलीस त्याच्या घरापर्यंत पोहोचले आणि त्याला बेड्या ठोकल्या. आपण आपल्या बचावासाठी चाकू हल्ला केल्याचं त्यानं सांगितलं. मात्र आपल्याजवळ चाकू का होता आणि एलनवर चाकू हल्ला का केला याचं ठोस कारण तो देऊ शकला नाही. त्याला अटक करण्यात आली आणि आता त्याला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं असून डिसेंबरमध्ये शिक्षा ठोठावली जाणार आहे.

Published by: Priya Lad
First published: October 28, 2020, 6:07 PM IST

ताज्या बातम्या