S M L

कॅनडामध्ये ठरणार का सिंग इज किंग ?,जगमीत सिंग पंतप्रधानपदाच्या शर्यतीत !

कॅनडामधल्या एका मोठ्या पक्षाचं नेतृत्व भारतीय वंशाचे जगमीत सिंग यांच्याकडे गेलंय. 2019 च्या निवडणुकीत ते कॅनडाच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार आहेत.

Sachin Salve | Updated On: Oct 3, 2017 06:43 PM IST

कॅनडामध्ये ठरणार का सिंग इज किंग ?,जगमीत सिंग पंतप्रधानपदाच्या शर्यतीत !

03 आॅक्टोबर : कॅनडामधल्या एका मोठ्या पक्षाचं नेतृत्व भारतीय वंशाचे जगमीत सिंग यांच्याकडे गेलंय. 2019 च्या निवडणुकीत ते कॅनडाच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार आहेत.

जगमीत जगतारण सिंग धालिवाल कॅनडाच्या न्यू डेमॉक्रॅटिक पार्टीचे अध्यक्ष झालेत. भारतीय वंशाचे जगमीत सिंग हे 2019 साली कॅनडात पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. पक्षांतर्गत निवडणुकीत त्यांना भरघोस मतं मिळाली, आणि ते पक्षाचे अध्यक्ष झाले.

जगमीत यांचा जन्म 2 जानेवारी 1979 चा.. कॅनडाच्या टॉरोंटो शहराजवळच्या स्कारबोरोमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे आईवडील 60 च्या दशकात कॅनडात स्थायिक झाले. त्यांनी बीएससी केलं, त्यानंतर लॉची पदवीही मिळवली. राजकारणात यायच्या आधी ते फौजदारी वकील म्हणून काम करायचे. 2011 साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पंजाबी, इंग्रजी आणि फ्रेंच भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे.सिंग हे संसदेत बरेच सक्रिय आहेत. त्यांनी कार विमाचं प्रीमियम कमी करण्याचं एक विधेयक आणलं होतं. ते मंजूर होऊ शकलं नाही, पण सिंग यांची लोकप्रियता चांगलीच वाढली. ते स्वतःला पुरोगामी म्हणवतात. समलिंगी लोकांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत, या मताचे ते आहेत. त्यांचा पेहराव आणि स्टाईल चांगलीच लोकप्रिय आहे. तिथल्या मासिकांमध्ये त्यांचे फोटो झळकत असतात. असे हे लोकप्रिय जगमीत सिंग 2019 मध्ये कॅनडासारख्या प्रगत देशाचं नेतृत्व करू शकतील का, ते पाहायचं.

कोण आहेत जगमीत सिंग?

- जन्म - 2 जानेवारी 1979

Loading...

- जन्मस्थळ - स्कारबोरो, टॉरोंटो

- आई-वडील 60च्या दशकात कॅनडात स्थाईक

- शिक्षण - बीएससी, लॉमध्ये पदवी

- फौजदारी वकील म्हणून कारकीर्दीला सुरुवात

- 2011मध्ये राजकारणात प्रवेश

- पंजाबी, इंग्रजी आणि फ्रेंचवर प्रभुत्व

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 3, 2017 06:43 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close