Home /News /videsh /

क्रूरतेचा कळस! स्वतःच्याच नवजात बाळाला बाथरूमच्या खिडकीतून फेकलं; अमेरिकेत भारतीय वंशाच्या आईला अटक

क्रूरतेचा कळस! स्वतःच्याच नवजात बाळाला बाथरूमच्या खिडकीतून फेकलं; अमेरिकेत भारतीय वंशाच्या आईला अटक

New York मध्ये ही विचित्र घटना उजेडात आली आहे. नवजात अर्भक खिडकीखाली रडताना आढळल्याने शेजाऱ्याने पोलिसांना बोलावलं तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

    न्यूयॉर्क, 14 ऑक्टोबर : विश्वास बसणार नाही, अशी घटना अमेरिकेत उघडकीस आली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या आईने आपल्याच नवजात अर्भकाला सरळ खिडकीतून खाली फेकून दिलं आणि निवांत अंघोळ करून झोपली. या घटनेत बाळाला गंभीर इजा झाली असली तरी त्याचा जीव वाचला आहे. बाथरूममध्ये असताना मला अचानक कळा लागल्या आणि बाळ बाहेर आलं. मला काही कळलं नाही. मी घाबरले. म्हणून मी त्याला खिडकीबाहेर फेकलं, असं या बाईने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. अमेरिकेत न्यूयॉर्कच्या क्वीन्स भागात वास्तव्यास असणाऱ्या सबिता डूकराम या महिलेला खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली न्यूयॉर्क पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 23 वर्षांच्या सबिताने असं का केलं, याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात उलट सुटल माहिती दिली आहे. बाथरूममध्ये असताना तिला बाळ झालं. तिने तिथल्याच कात्रीने नाळ कापून बाळाला खिडकीत ठेवलं. स्वतः अंघोळ करून बाहेर आली. तिला ग्लानी आली आणि ती झोपली. शेजाऱ्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी खिडकीखाली पाहिलं तर गंभीर अवस्थेत पडलेलं नवजात अर्भक दिसलं. तातडीने या बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पाच फुटांवरून पडल्याने बाळाच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. कवटीचं हाड फ्रॅक्चर झालं आहे. बराच रक्तस्रावही झाल्याने बाळाची प्रकृती गंभीर असल्याचं अमेरिकन वृत्तात म्हटलं आहे. जन्मल्यानंतर काही तास ते बालक तसंच विवस्त्र पडून होतं. किमान 50 हजार अमेरिकन डॉलरचा दंड आरोपीकडून वसूल करावा असा दावा कोर्टात सरकारी अॅटर्नीने केला आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Crime

    पुढील बातम्या