कोरोनामुळे परदेशात मृत्यू, भारतीयावर दोन वेळा अंत्यसंस्कार

कोरोनामुळे परदेशात मृत्यू, भारतीयावर दोन वेळा अंत्यसंस्कार

भारतीय व्यक्तीचा कोरोनामुळे परदेशात मृत्यू झाला. लॉकाडाऊनमुळे मृतदेह आणणे शक्य नसल्यानं तिथंच दफनविधी झाला मात्र त्यानंतर कुटुंबानेही गावी प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केले.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 मे : आखाती देशांपैकी एक असलेल्या कुवैतमध्ये राजस्थानमधील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे त्याचा मृतदेह भारतात आणणं शक्य नव्हतं. यामुळे कुवेत प्रशासनाने मृतदेह त्यांच्याच देशात दफन केला. दरम्यान, राजस्थानमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांनी त्याचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून हिंदू रितिरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले.

डुंगरपूर इथल्या सीमलवाडामध्ये राहणाऱे दिलीप बऱ्याच वर्षांपासून कुवेत इथं हॉटेल व्यवसाय करत होते. तिथंच त्यांना कोरोनाची लागण झाली. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाची लागण झालेली असल्यानं त्यांचा मृतदेह भारतात पाठवण्यात अनेक अडचणी होत्या. त्यामुळे कुवेत सरकारने शेवटी तिथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आणि मृतदेह दफन केला.

हे वाचा : लॉकडाउनमध्ये घरी आलेल्या कैद्याला अशीही मदत, कुटुंबीय भारावले

कुवेतमध्ये दफनविधी झाला तरी राजस्थानात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना अंत्यसंस्कार करता न आल्याचं वाईट वाटत होतं. शेवटी कुटुंबियांनी त्यांचा अंत्यसंस्कार कऱण्याच निर्णय घेतला आणि त्यांचा एक पुतळा तयार केला. प्रतिकात्मक पुतळ्याला त्यांचे जुने कपडे घालण्यात आले. तर मुखवट्याला फोटो लावण्यात आला. त्यानंतर अंत्ययात्रा काढली आणि स्मशानभूमीत मुखाग्नी देण्यात आला.

हे वाचा : एका ट्विटमुळे कंपनीला 1 लाख कोटींचा फटका तर वैयक्तिक 22.6 हजार कोटींचं नुकसान

First published: May 2, 2020, 5:11 PM IST

ताज्या बातम्या