मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

लाहोरमध्ये लागले अभिनंदन आणि PM मोदींचे फोटो, कारण वाचून बसेल धक्का

लाहोरमध्ये लागले अभिनंदन आणि PM मोदींचे फोटो, कारण वाचून बसेल धक्का

सादिक यांना गद्दार ठरवण्यात येऊन भारताचा मित्र म्हटल्या गेलं. त्यामुळे त्यांचा मतदारसंघ असलेल्या लोहोरमध्ये त्यांच्या विरोधात देशद्रोही असल्याचे हे पोस्टर्स लावण्यात आले आहे.

सादिक यांना गद्दार ठरवण्यात येऊन भारताचा मित्र म्हटल्या गेलं. त्यामुळे त्यांचा मतदारसंघ असलेल्या लोहोरमध्ये त्यांच्या विरोधात देशद्रोही असल्याचे हे पोस्टर्स लावण्यात आले आहे.

सादिक यांना गद्दार ठरवण्यात येऊन भारताचा मित्र म्हटल्या गेलं. त्यामुळे त्यांचा मतदारसंघ असलेल्या लोहोरमध्ये त्यांच्या विरोधात देशद्रोही असल्याचे हे पोस्टर्स लावण्यात आले आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar

इस्लामाबाद 01 नोव्हेंबर: पाकिस्तानमध्ये (Pakistan) भारताचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan varthaman) याच्यावरून सुरू झालेलं वादळ अजुनही शांत झालेलं नाही. आता तर लोहोरमधल्या(Lahor) रस्त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi)  आणि अभिनंद वर्धमान यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. असे पोस्टर्स लावून त्यात नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाचे नेते अयाज सादिक यांना देशद्रोदी ठरवण्यात आलं आहे.

सादिक यांनी पाकिस्तानच्या संसदेत बोलताना एक गौप्यस्फोट केला होता. त्यात त्यांनी पकिस्तानच्या ताब्यात असलेल्या अभिनंदनला सोडण्यामागचं कारण सांगितलं होतं. भारताने हल्ला करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे लष्कर प्रमुख घाबरून गेले होते अशी एका बैठकीतली घटना त्यांनी उघड केली होती. त्यानंतर पाकिस्तानात वादळ निर्माण झालं होतं.

आपण ज्या बैठकित उपस्थित होतो त्याच बैठकीत पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारत हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे लष्कर प्रमुखांना दरदरून घाम फुटला होता अशी माहिती दिली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत सहभागी होणं पडलं महागात; 700 जणांनी गमवले प्राण

त्यामुळे सादिक यांना गद्दार ठरवण्यात येऊन भारताचा मित्र म्हटल्या गेलं. त्यामुळे त्यांचा मतदारसंघ असलेल्या लोहोरमध्ये त्यांच्या विरोधात देशद्रोही असल्याचे हे पोस्टर्स लावण्यात आले आहे. सोशल मीडियावरही हे पोस्टर्स व्हायरल झाले आहेत.

पाकिस्तानच्या मंत्र्यांची कबुली

जम्मू आणि काश्मीरमध्ये पुलवामा इथं झालेला हल्ला (Pulwama attack) हा आम्हीच घडवला. इम्रान खान (Pakistan PM Imran Khan)सरकारचं ते सगळ्यात मोठं यश आहे अशी कबुली पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी दिली आहे. पहिल्यांदाच पाकिस्तानच्या मंत्र्यानेच अशी कबुली दिल्याने खळबळ उडाली असून पाकिस्तानचा दहशतवादी घटनांमधला सहभाग पुन्हा एकदा उघड झाला आहे.

या हल्ल्यामागे पाकिस्तानच आहे आणि त्याचे भारताकडे पुरावे आहेत असा भारताचा दावा होता. त्यावर पाकिस्तानने ते कधीच मान्य केलं नाही. मात्र आता खुद्द सरकारच्या मंत्र्यानेच ती कबुली दिल्याने पाकिस्तानचा खरा चेहरा उघड झाल्याचं म्हटलं जातं.

72 तासांत फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा हल्ला, चर्चच्या फादरवर झाडल्या गोळ्या

पाकिस्तानच्या ताब्यात गेलेला भारताचा पायलट कॅप्टन अभिनंदनला सोडलं नाही तर भारत रात्री 9 वाजता पाकिस्तानवर हल्ला करू शकतो असं परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी त्यावेळी एका बैठकीत सांगितलं होतं असा दावा पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते अयाज सादिक यांनी केला होता. त्यामुळे भीतीने पाकिस्तानने अभिनंदनची सुटका केली अशी इम्रान खान यांच्यावर टीका होऊ लागली.

First published:

Tags: India, Pakistan