Home /News /videsh /

हे फक्त भारतीयच करू शकतात! महिलेला परत केलं लॉटरीचं तिकिट, जिंकली 7 कोटींपेक्षाही जास्त रक्कम

हे फक्त भारतीयच करू शकतात! महिलेला परत केलं लॉटरीचं तिकिट, जिंकली 7 कोटींपेक्षाही जास्त रक्कम

Massachusetts याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या मूळचे भारतीय असणाऱ्या शाह परिवाराने (Shah Family) प्रामाणिकपणाचा आदर्श समोर ठेवला आहे. सध्या शहरात त्यांचीच चर्चा होत आहे.

    न्यूयॉर्क, 26 मे: भारतीय मूल्य, तत्त्व, संस्कार यांची जगभरात अनेकदा चर्चा होत असते. केवळ चर्चाच नाही तर याबाबत कौतुक देखील होतं. त्याचप्रमाणे बाहेर देशात राहणारे भारतीय आजही आपले मूळ संस्कार विसरले नाहीत, याचा प्रत्ययही वारंवार येतो. असाच एक प्रत्यय मेसॅच्युसेट्स (Massachusetts) मध्ये आला आहे. याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या शाह परिवाराने (Shah Family) प्रामाणिकपणाचा आदर्श समोर ठेवला आहे. सध्या शहरात त्यांचीच चर्चा होत आहे. शाह कुटुंबीयांनी एका महिलेला लॉटरीचं तिकिट परत केलं आहे. ज्यातून या महिलेनं कोट्यवधी रुपये जिंकले आहेत. त्या महिलेने एवढी मोठी रक्कम जिंकल्याचं माहित असूनही त्यांनी तिला तिचं तिकिट परत केल्याने शाह कुटुंबीयांचं कौतुक होत आहे. ली रोज फिएगा (Lea Rose Fiega) या महिलेने शाह परिवाराच्या 'लकी स्टॉप' नावाच्या एका दुकानातून लॉटरीचं तिकिट विकत घेतलं होतं. ती नेहमी इथून तिकिट खरेदी करायची. मात्र त्यादिवशी तिकिट खरेदी करताना गडबडीत असल्याने तिने लॉटरी अर्धवटच स्क्रॅच केली आणि तिने तिकिट फेकण्यास सांगितलं. तिला वाटलं की तिने लॉटरी जिंकली नाही आहे. हे वाचा-फाटक्या बूटाचा फोटो शेअर करणे महागात, झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू संकटात झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार 10 दिवस ते तिकिट तिथेच पडून होतं. इतर वाया गेलेल्या तिकिटांबरोबर ते तिकिट तिथंच पडून होतं. त्यानंतर दुकानाचे मालक अभि शाह यांना हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी ते त्यांची आई अरुणा शाह यांना सांगितलं. वाया गेलेल्या या तिकिटांपैकी संबंधित तिकिटाचा क्रमांक पूर्ण स्क्रॅच गेलेला नसल्यामुळे त्यांनी तो स्क्रॅच केला आणि तेव्हा लक्षात आलं की त्यात दहा लाख डॉलरची म्हणजेच जवळपास 7,27,90,700 रुपयांची लॉटरी होती. भारतात राहणाऱ्या आजीने दिला मोलाचा सल्ला एवढी मोठ्या रकमेच्या तिकिटाबाबत काय निर्णय घ्यायचा याचा विचार करत असताना अभी यांनी भारतातील त्यांच्या आजीला फोन केला. असा पैसा आपल्याला नको असं म्हणत आजीने त्यांना संबंधित महिलेचे पैसे परत करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर फिएगा यांना त्यांचं तिकिट परत करण्यात आलं. त्यांना देखील याबाबत विश्वास बसत नव्हता पण शाह कुटुंबीयांचं शहरात मात्र कौतुक होत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Lottery

    पुढील बातम्या