दुबईत कोरोनाग्रस्तांसाठी भारतीयाने बिल्डिंग केली दान, एकावेळी 400 जणांवर होतील उपचार

दुबईत कोरोनाग्रस्तांसाठी भारतीयाने बिल्डिंग केली दान, एकावेळी 400 जणांवर होतील उपचार

कोरोनाशी लढण्यासाठी सध्या तरी कोणतंच औषध नाही. मात्र माणुसकी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पुढे येत आहे.

  • Share this:

दुबई, 08 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमधील जनजीवन ठप्प झालं आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या परिस्थितीत माणुसकीचं दर्शन होताना दिसत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सध्या तरी कोणतंच औषध नाही. मात्र माणुसकी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पुढे येत आहे. कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांवर उपचारासाठी दुबईत एका भारतीयाने अनोखी मदत केली आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार व्हावेत यासाठी भारतीय उद्योगपतीने संपूर्ण बिल्डिंग दान केली आहे. या बिल्डिंगमध्ये लोकांना क्वारंटाइन करता येणार आहे.

खलीज टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार संयुक्त अरब अमिरातीमध्ये दुबईतील सराफ उद्योजक अजय शोभराज यांनी जुमैराह लेक टॉवर नावाची बिल्डिंग कोरोनाग्रस्तांसाठी दिली आहे. यामध्ये क्वारंटाइन झालेल्यांना ठेवण्यात येणार आहे. 77 हजार स्क्वेअर फूट जागेत असलेल्या बिल्डिंगमध्ये 400 जणांवर उपचार होऊ शकतात.

दुबईतील हेल्थ अथॉरिटीला अजय शोभराज यांनी पत्र लिहिलं आहे. त्यात म्हटलं की, जे शहर देखभाल करतं त्या शहराला मदत करा आणि त्याचं कर्ज फेडा. मला वाटतं की या संकट काळात आपण ज्या देशात राहतो तिथं कोरोनापासून वाचण्यासाठी सहकार्य गरजेचं आहे. त्यासाठी लोकांनी पुढे येणं आवश्यक आहे. या काळात सरकारची मदत करून माझ्या 25 वर्षांच्या यशात वाटा असलेल्या या शहरासाठी काहीतरी केल्याचा मला खूप मोठा आनंद आहे.

हे वाचा : वडील गेल्याचं समजल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यानं पूर्ण केलं काम, पुन्हा ड्युटीवर हजर

जुमैराह लेक टॉवरमध्ये सर्व सोयी सुविधा आहेत. यामध्ये इमारतीला स्वच्छ आणि कीटाणूमुक्त ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. यामुळे संक्रमित रुग्णांवर योग्य उपचार होतील आणि सुरक्षेच्या सर्व अटीही पूर्ण होतील.

हे वाचा : दुबईहून आलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू, सर्व गाव केलं सील

संयुक्त अरब अमिरातीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आतापर्यंत जवळपास 2 हजार कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द कऱण्यात आली आहेत. याशिवाय संचारबंदीही लागू कऱण्यात आली आहे.

हे वाचा : शेवटचं बोलून घ्या! मृत्यूच्या दारात कोरोनाग्रस्तांना मेडिकल स्टाफ देतोय मोबाईल

संपादन - सुरज यादव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2020 09:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading