ड्रॅगनच्या नाकाला झोंबली मिर्ची, 59 app बॅन केल्यानंतर चीन मीडिया काय म्हणाला?

ड्रॅगनच्या नाकाला झोंबली मिर्ची, 59 app बॅन केल्यानंतर चीन मीडिया काय म्हणाला?

लडाखमधील गलवात खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत-चीन सीमारेषेवरील तणाव अद्याप निवळण्याचं नाव घेत नाही.

  • Share this:

बीजिंग, 30 जून: लडाखमधील गलवात खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत-चीन सीमारेषेवरील तणाव अद्याप निवळण्याचं नाव घेत नाही. चीनच्या वेगवेगळ्या पद्धतीनं खेळी सुरू असतानाच आता भारतात चीनी साहित्य, अॅप आणि वस्तूंवर नागरिक आणि प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. चीनचे मंसुबे उधळून लावण्यासाठी भारत सर्वतोपरीनं सज्ज आहे. सायबर हल्ल्यापासून ते सीमेवर होऊ शकणाऱ्या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी भारत सज्ज झाला आहे.

केंद्र सरकारनं सोमवारी चीनच्या 59 अॅपवर बंदी घालण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये टिकटॉक, यूसी आणि हेलोसारखे अनेक अॅप आहेत. भारतानं घेतलेल्या या निर्णयानंतर चीनला मात्र चांगल्या मीर्च्या झोंबल्या आहेत. भारत अमेरिकेची नक्कल करत आहे. चीनी वस्तू, अॅपवर बहिष्कार घालण्यासाठी भारत अमेरिकेसारख्या सबबी शोधत असल्याचं चीन मीडियाने म्हटलं आहे.

चायना अॅपच्या माध्यमातून चीन Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर काही अॅप्सचा गैरवापर करत आहे. हे अ‍ॅप्स गुप्तपणे आणि बेकायदेशीरपणे वापरकर्त्याचा डेटा चोरून तो भारताबाहेरील सर्व्हरवरला पाठवत होते. या व्यतिरिक्त भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र, गृह मंत्रालय यांनाही अशा धोकादायक अ‍ॅप्सवर तातडीनं बंदी घालण्याची शिफारस केली होती. त्यानुसार 59 अॅप्स भारतात न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या सायबर विभागानेही (maharashtra cyber) अलर्ट जारी केला आहे. काही ऑनलाइन फिल्म्स आणि वेबसीरिज पाहणं चांगलंच महागात पडू शकतं, असं सरकारने सांगितलं आहे. ऑनलाइन फिल्म्स पाहण्याच्या नादात तुमचा प्रायव्हेट डेटा चोरीला जाऊ शकतो. हॅकर्स यावर टपून बसले आहेत. अशी सूचना जारी करण्यात आली आहे. असे दहा चित्रपट आणि दहा वेबसीरिजची यादी सरकारने जारी केली आहे. त्याची संपूर्ण यादी या बातमीत पाहा.

यामध्ये दिल्ली क्राइम, ब्रुकलीन नाइन-नाइन अशा वेब सीरिज तर मर्दानी 20, छपाक, जवानी जानेमन, बाहुबली अशा चित्रपटांचा समावेश आहे.

या यादीतील कोणतीही वेबसीरिज तुम्ही पाहत असाल, चित्रपट ऑनलाइन पाहत असाल किंवा डाऊनलोड करत असाल तर सावध राहा. ऑनलाइन मुव्ही पाहताना कोणतीही परवानगी देऊ नका. नाहीतर हॅकर्स तुमचा पर्सनल डाटा चोरी करतील, असं सायबर विभागाने सांगितलं आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 30, 2020, 9:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading