Home /News /videsh /

इम्रान खान पुन्हा बरळले! म्हणे, भारतानं अफगाणिस्तानच्या साथीने पाकिस्तानात दहशतवाद पसरवला

इम्रान खान पुन्हा बरळले! म्हणे, भारतानं अफगाणिस्तानच्या साथीने पाकिस्तानात दहशतवाद पसरवला

अफगाणिस्तानातील (Afghanistan) जुन्या सरकारच्या (Previous government) मदतीने भारताने (India) पाकिस्तानात दहशतवादी कारवाया (terror activities) केल्याचं पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

    न्यूयॉर्क, 16 सप्टेंबर : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) हे नेहमीच त्यांच्या विसंगत (Illogical) आणि वादग्रस्त (Controversial) विधानांसाठी ओळखले जातात. अफगाणिस्तानातील (Afghanistan) जुन्या सरकारच्या (Previous government) मदतीने भारताने (India) पाकिस्तानात दहशतवादी कारवाया (terror activities) केल्याचं पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे. अमेरिकेतील न्यूज चॅनल सीएऩएनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. काय म्हणाले इम्रान खान? आम्ही अमेरिकेला त्यांच्या युद्धात सर्वतोपरी मदत केली. मात्र अमेरिकेनं अफगाणिस्तानमध्ये भारतधार्जिणं सरकार बसवलं, असा आरोप इम्रान खान यांनी केला. पाकिस्तानचा शेजारी असणाऱ्या अफगाणिस्तानमधील जुन्या सरकारसोबत पाकिस्तानचे चांगले संबंध होते. मात्र अमेरिका आल्यानंतर तिथलं सरकार हे भारताला सोयीस्कर ठरेल, असं बसवण्यात आलं. त्यामुळे भारतानं अफगाणिस्तानातील जुन्या सरकारच्या मदतीनं पाकिस्तानात दहशतवाद पसरवण्याचं काम केल्याचा दावा इम्रान खान यांनी केला. पत्रकारांच्या प्रश्नावर चिडले इम्रान खान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे भारताच्या पंतप्रधानांसोबत बोलतात, इतर देशांच्या प्रमुखांनाही फोन करतात. मात्र ते कधीच तुम्हाला थेट फोन करत नाहीत. याचं काय कारण असावं, असा प्रश्न जेव्हा पत्रकाराने इम्रान खान यांना विचारला, तेव्हा ते काहीसे चिडले. एखादा फोन कॉल हा काही दोन देशांतील संबंध ठरवण्याचा निकष असू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं. अमेरिका आणि पाकिस्तानचे चांगले संबंध असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत. चीनबाबत भाष्य अमेरिका स्वतःला वाचवण्यासाठी पाकिस्तानला चीनकडे ढकलतंय का, असा प्रश्न इम्रान खान यांना विचारण्यात आला. त्यावर चीन आणि पाकिस्तानची मैत्री गेल्या 75 वर्षांची असून वर्षानुवर्षं ती अधिकच दृढ झाल्याचं त्यांनी म्हटलं. अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधांचा चीनसोबतच्या संबंधांवर कधीही परिणाम होणार नसल्याचं ते म्हणाले. हे वाचा -मंत्र्यांनी दिली होती एनकाउंटरची धमकी, रेल्वे रुळावर सापडला आरोपीचा मृतदेह बदललेल्या परिस्थितीवर भाष्य भारताकडून पाकिस्तानला आव्हान दिलं जात असून जर अफगाणिस्तानमधूनही कारवाया होत असतील, तर आपल्यासमोरचं आव्हान बिकट होणार असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे दोन्ही सीमांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी असून भारत, चीन आणि अफगाणिस्तान या तिन्ही देशांसोबतचे संबंध सामान्य आणि चांगले असावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, India, Pak pm Imran Khan

    पुढील बातम्या