चोराच्या उलट्या बोंबा, 2014चा पेशावरच्या शाळेवरील हल्ला भारत पुरस्कृत

आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पाकनं पेशावर हल्ल्याप्रकरणी उलट्या बोंबा मारल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 19, 2019 09:26 PM IST

चोराच्या उलट्या बोंबा, 2014चा पेशावरच्या शाळेवरील हल्ला भारत पुरस्कृत

लास वेगास, 19 फेब्रुवारी : 2014मध्ये पेशावर येथे शाळेवर झालेला हल्ला हा भारत पुरस्कृत होता, असा आरोप पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय न्यायालयात केला आहे. लास वेगास येथे कुलभूषण जाधव हेरगिरी प्रकरणाची सुनावणी सुरू असून आजचा दुसरा दिवस आहे. त्यावेळी पाकने हा आरोप केला. कुलभूषण जाधव हेरगिरी प्रकरणी आखणी दोन दिवस कामकाज चालणार आहे.

सोमवारी भारतानं बाजू मांडल्यानंतर आज पाकिस्तान आपलं म्हणणं मांडत आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानला आणखी एक-एक दिवस बाजू मांडण्यासाठी मिळणार आहे.

पेशावर हल्ल्यात 140 विद्यार्थ्यांचा गेला होता जीव

पेशावर येथील सैनिकी शाळेवर तेहरिक - ए - तालिबाननं या दहशतवादी संघटनेनं हल्ला केला होता. यामध्ये 140 विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. यामध्ये आता पाकिस्ताननं भारताला आरोप केले आहेत. शाळेवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेनं अफगाणिस्तानमधील नांगरहार प्रांतातील बांदर भागात ड्रोननं हल्ले केले होते. यामध्ये तेहरिक - ए - तालिबानचा कमांडर ठार झाला होता.

काय आहे कुलभूषण हेरगिरी प्रकरण

Loading...

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना अटक केली. त्यानंतर लष्करी न्यायालयानं त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. अखेर हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पोहोचलं. त्यानंतर न्यायालयानं जाधव यांच्या शिक्षेला स्थगिती दिली असून त्यावर सध्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. हरीश साळवे भारताकडून कुलभूषण जाधव यांची बाजू मांडत आहेत.

डिसेंबर 2017 मध्ये कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पाकिस्ताननं दिलेल्या वागणुकीवरून मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.

=========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2019 09:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...