S M L

फेसबुकवरून डेटा चोरणाऱ्या कंपनीला भारत सरकारची नोटीस, 31 मार्चपर्यंत उत्तर देण्याचे आदेश

अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये 5 कोटी फेसबुक सदस्यांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा आरोप असणाऱ्या केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीवरुन आता भारतीय राजकारणात खडाजंगी सुरू झाली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 24, 2018 12:26 PM IST

फेसबुकवरून डेटा चोरणाऱ्या कंपनीला भारत सरकारची नोटीस, 31 मार्चपर्यंत उत्तर देण्याचे आदेश

24 मार्च : फेसबुकवरून डेटा चोरणाऱ्या केंब्रिज अॅनालिटिका कंपनीला भारत सरकारनं कठोर शब्दातं नोटीस पाठवली आहे. नोटिशीत अनेक प्रश्न कंपनीला विचारण्यात आले आहेत. 31 मार्चपर्यंत उत्तर द्या, असे आदेश कंपनीला देण्यात आलेत. जगभरात या कंपनीच्या कार्यालयांवर छापे पडतायेत, अधिकाऱ्यांची चौकशी होतेय. पण भारतात आतापर्यंत एकही प्रकरण उघड न झाल्यानं कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये 5 कोटी फेसबुक सदस्यांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा आरोप असणाऱ्या केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीवरुन आता भारतीय राजकारणात खडाजंगी सुरू झाली आहे.

भारतीयांच्या माहितीचा वापर करण्यामध्ये कंपनीचा स्वतःचा सहभाग आहे का?,कंपनीच्या माध्यमातून भारतीयांची माहिती मिळवणाऱ्या दुसऱ्या कंपन्या कोणत्या आहेत?, भारतीयांची माहिती त्यांनी कशा प्रकारे मिळवली?, माहिती मिळवण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेतली होती का?, या माहितीपर्यंत कंपनी कशी पोहोचली?, या मिळवलेल्या माहितीच्या आधारे काही नवी प्रोफाईल्स तयार करण्यात आली आहेत का? यांसारख्या प्रश्नांचा नोटीसमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. 23 मार्च 2018 ला केंद्र सरकारने केम्ब्रिज अनॅलिटिकाला ही नोटीस पाठवली आहे.

पाहूयात भारत सरकारनं या कंपनीला नेमके कोणते प्रश्न विचारलेत

- कोणत्याही कामात भारतीयांची माहिती वापरली होती का ?

Loading...
Loading...

- भारतातल्या कोणकोणत्या कंपन्यांनी तुमच्याशी व्यवहार केलाय ?

- फेसबुक युजर्सची माहिती नक्की कशी चोरली जाते ?

- केंब्रिज अॅनालिटिका ही माहिती नक्की कशी वापरते ?

- नागरिकांचं प्रोफाईलिंगही केलं जातं का ?

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2018 12:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close