ऑक्टोबरमध्ये होणार भारत-पाक युद्ध; मंत्र्याच्या वक्तव्याने खळबळ!

पाकिस्तान(Pakistan)मधील इम्रान खान (Imran Khan)सरकारमधील एक मंत्र्याने खळबळ जनक वक्तव्य केले आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2019 06:01 PM IST

ऑक्टोबरमध्ये होणार भारत-पाक युद्ध; मंत्र्याच्या वक्तव्याने खळबळ!

इस्लामाबाद, 28 ऑगस्ट: पाकिस्तान(Pakistan)मधील इम्रान खान (Imran Khan)सरकारमधील एक मंत्र्याने खळबळ जनक वक्तव्य केले आहे. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीत अहमद (Pakistan Railways Minister Sheikh Rashid Ahmed) यांनी भारतासोबत एक पूर्ण युद्ध (War) होणार असल्याचा दावा केला आहे. इतक नव्हे तर हे युद्ध (India Pakistan War)ऑक्टोबर किंवा त्यानंतर होईल अशी भविष्यवाणी देखील त्यांनी केली आहे. पाक मंत्र्यांनी केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे.

'आम्ही श्रीनगर घेण्याच्या गप्पा करायचो आता POK वाचवण्याचा प्रयत्न करतोय'

पाकिस्तान मीडियाच्या हवाल्याने रेल्वे मंत्री अहमद या विधानाचे वृत्त देण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. काश्मीर हा विषय आंतरराष्ट्रीय करण्याचा पाकिस्तानने अनेक प्रयत्न केला. पण पाकिस्तानला त्यात यश आले नाही. त्यानंतर इम्रान खान यांनी भारताला अण्विक युद्धाची धमकी देखील दिली. अर्थात पाकिस्तानकडून झालेले अशा प्रकारचे हे पहिले वक्तव्य नाही. याआधी पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कुरेशी यांनी यांनी इस्लामाबाद येथे काश्मीर मुद्द्यावर आयोजित एका सेमिनारमध्ये अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, पाकिस्तान काश्मिरी लोकांच्या अधिकारासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. भारताने बेकायदेशीर पद्धतीने कलम 370 हटवले आणि तणाव निर्माण केला. यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे. जर तसे झालेच तर पाकिस्तान त्यासाठी तयार असल्याचे कुरेशी म्हणाले.

पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत देखील आम्ही हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे कुरेशी म्हणाले. कलम 370च्या मुद्द्यावरून चीन वगळता जगभरातील सर्वच देशांनी पाकिस्तानची साथ सोडली आहे. अगदी अमेरिकेने देखील या प्रकरणी भारताची बाजू घेतली आहे.

पाक बिथरला : इम्रान खान यांनी दिली अणुयुद्धाची धमकी, महासत्तेलाही दिला हा इशारा

सौदीची मदत

काश्मीर प्रश्नानावर एकटा पडलेल्या पाकिस्तानने आता सौदी अरबकडे धाव घेतली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी एका महिन्यात दुसऱ्यांदा सौदीचे वली अहद मोहम्मद बिन सलमान यांच्याशी काश्मीर प्रश्नावर चर्चा केली. इम्रान यांनी काश्मीरला पुन्हा विशेष राज्याचा दर्जा देण्यासंदर्भात चर्चा केली होती.

बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 05:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...