चीनला टक्कर देण्यासाठी भारत बनवतोय महाकाय मिसाईल; अमेरिकेच्या तज्ज्ञांचा दावा

चीनला टक्कर देण्यासाठी भारत बनवतोय महाकाय मिसाईल; अमेरिकेच्या तज्ज्ञांचा दावा

संपूर्ण चीनला उद्ध्वस्त करू शकेल अशा मिसाईल्स आता भारत बनवतोय असं अमेरिकेच्या विशेषज्ञांचं मत आहे.

  • Share this:

13 जुलै : संपूर्ण चीनला उद्ध्वस्त करू शकेल अशा मिसाईल्स आता भारत बनवतोय असं अमेरिकेच्या विशेषज्ञांचं मत आहे. तसंच आतापर्यंत भारताचा सगळा न्युक्लिअर फोर्स हा पाकिस्तानला लक्ष्य करून बनवला गेला होता. आता मात्र भारत त्याचा न्युक्लिअर फोर्स चीनला डोळ्यासमोर ठेवून वाढवत चाललाय.

काही दिवसांपासून चीन आणि भारतामधला तणाव वाढत चाललाय. यावरच 'आफ्टर मिडनाईट' या मासिकात हेन्स एम क्रिस्टेंसेन आणि रॉबर्ट एस नॉरिस 'इंडियन न्युक्लियर फोर्स' नावाचा एक लेख लिहिलाय. या लेखात भारत त्याची न्युक्लिअर पॉवर कशी वाढवत चाललाय याबाबत विस्तृत वर्णन केलंय. भारतातील  दक्षिण भारताच्या बेसवरून सोडल्यावर संपूर्ण चीन उद्ध्वस्त करू शकेल इतक्या ताकदीच्या मिसाईल बनवतोय. 150-200 परमाणू शस्त्र बनवू शकेल  इतक्या प्लुटेनियमचा साठा आता भारतानं जमा  केलाय. आणि आतापर्यंत भारताने 120-150 शस्त्र बनवल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय.

आतापर्यंत भारताची सारी रणनीती ही पाकिस्तान केंद्री होती. पण आता भारत ज्याप्रकारे शस्त्रास्त्र बनवू लागलाय त्यावरून यापुढे भारत आणि चीनमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. तज्ज्ञांच्या मते सध्या भारताकडे सात अस्त्रांची सक्षम परमाणू प्रणाली आहेत. यात दोन विमानं आहेत,जमिनीवरून लॉँच होणाऱ्या चार बॅलेस्टिक मिसाइल्स आणि समुद्राखालून चालणारी एक बॅलेस्टिक मिसाईल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2017 10:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading