जागतिक बॅंकेच्या ईझ टू ट्रेड निर्देशांकात भारत 100व्या क्रमांकावर

तसंच आपल्या मानांकनात सुधारणा साधणाऱ्या सर्वोत्तम १० देशांमध्येही यंदा भारताने स्थान पटकावले आहे. हा निर्देशांक व मानांकन ठरवताना भारतातील मुंबई व दिल्ली या दोन शहरातील परिस्थिती प्रामुख्याने लक्षात घेण्यात आली आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2017 08:30 AM IST

जागतिक बॅंकेच्या ईझ टू ट्रेड निर्देशांकात भारत 100व्या क्रमांकावर

01 नोव्हेंबर: जागतिक बँकेतर्फे जाहीर करण्यात येणाऱ्या व्यवसाय करण्यासाठी सुलभता निर्देशांकाच्या १९० देशांच्या यादीत भारताने यंदा शंभरावे स्थान पटकावले आहे.

गतवर्षीच्या भारताच्या मानांकनात यंदा ३० अंकांनी सुधारणा झाली आहे.

तसंच आपल्या मानांकनात सुधारणा साधणाऱ्या सर्वोत्तम १० देशांमध्येही यंदा भारताने स्थान पटकावले आहे. हा निर्देशांक व मानांकन ठरवताना भारतातील मुंबई व दिल्ली या दोन शहरातील परिस्थिती प्रामुख्याने लक्षात घेण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीत मुंबईचे स्थान पुन्हा अधोरेखित झालं आहे.या मानांकनातून हे स्पष्ट होतं की, भारत व्यवसाय करण्यासाठी अधिक सज्ज आणि खुला आहे. तो आता जगातील अन्य देशांशी व्यवसाय करण्यासाठीचा चांगला देश म्हणून स्पर्धा करत आहे, असं जागतिक बँकेच्या दक्षिण आशिया विभागाच्या उपाध्यक्ष अ‍ॅनेट डिक्सन यांनी मंगळवारी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितले. पतपुरवठा व्यवस्थेत आणि बांधकाम परवानग्या मिळवण्यात झालेली सुधारणा यामुळे हे शक्य झाल्याचं डिक्सन म्हणाल्या. मात्र व्यवसाय सुरू करणे, कंत्राटे राबवून पूर्ण करणे अशा बाबतींत भारत अद्याप मागे असल्याचं जागतिक बँकेने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

त्यामुळे व्यापारासाठी पोषक वातावरण जरी भारताने तयार केलं असलं तरी भारताला अजून बऱ्याच सुधारणा करण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2017 08:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...