Home /News /videsh /

भारत-इज्राइलचं नातं झालं अधिक मजबूत; एका करारामुळे अनेक रस्ते झाले खुले

भारत-इज्राइलचं नातं झालं अधिक मजबूत; एका करारामुळे अनेक रस्ते झाले खुले

दोन्ही देश एकत्रित येऊन अनेक क्षेत्रात काम करणार आहेत, त्यातील एक क्षेत्र बॉलिवूड आहे..

    जेरुसलेम, 20 ऑगस्ट : भारत और इज्राईलमधील नातं आता अधिक मजबूत होत आहे. खरं तर दोन्ही देशांनी आपल्या लोकांमधील संपर्क वाढविण्यासाठी एका सांस्कृतिक करारवर गुरुवारी हस्ताक्षर केले आहे. याअंतर्गत तीन वर्षीय सहयोग कार्यक्रमाची रुपरेषा तयार करण्यात आली आहे. यातून दोन्ही देशांच्या द्विपक्षीय रणनीतीपूर्वी नात्यात नवा पायंडा पाडेल. येथे परराष्ट्र मंत्री (Ministry Of External Affairs) गबी अश्केनाजी आणि इज्राइलमध्ये भारताचे राजदूत संजीव सिंगला यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार, दोन्ही पक्षांनी या गोष्टींवर सहमती दर्शवली आहे की हा करार दोन्ही देशांचं नातं अधिक विकसित करण्यात मदत ठेवणार असेल आणि विशेष करुन तरुणांना दोन्ही देशातील सांस्कृतिक इतिहासाबाबत जागरुकता वाढविणारा असेल. दोन्ही देशांमध्ये मैत्रीत्व अधिक मजबूत करण्यासाठी परस्पर समजूतीला या करारामुळे मदत मिळेल. अश्के नाजी म्हणाले की, हा सांस्कृतिक सामंजस्य करार दोन्ही देशांमधी अनेक करारांपैकी एक आहे. यानंतर भारतासोबत पाण्यासंदर्भातही एक करार करण्यात येणार आहे. याशिवाय भारतातील प्रसिद्ध बॉलिवूड उद्योगासह परस्पर चित्रपट निर्मितीवरदेखील एकत्रितपणे काम करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय राजकारणात बऱ्य़ाच उलाढाली होत असताना दिसत आहे. कोरोनाचा फैलाव करण्याचा आरोप करीत अमेरिका चीनविरोधात सातत्याने आग ओकत आहेत. भारत-चीन तणावानंतर तर चीनविरोधात भारताने तलवार उचलली आहे. आता भारत इज्राइल यांच्यात मैत्रीत्व वाढल्यानंतर अनेकांना त्याचा फटका सहन कारावा लागू शकतो.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या