फ्रान्स एका वर्षात ग्रीसला देणार राफेल, भारतात विमानं पोहचायला का लागली 8 वर्षे? जाणून घ्या

फ्रान्स एका वर्षात ग्रीसला देणार राफेल, भारतात विमानं पोहचायला का लागली 8 वर्षे? जाणून घ्या

फ्रान्सने ग्रीसशी एक करार केला असून त्याअंतर्गत फ्रान्सकडून ग्रीसला 18 लढाऊ विमानं देण्यात येणार आहेत. या वर्षाच्या शेवटपर्यंत या कराराची कागदपत्रं तयार होतील आणि जून 2021 पर्यंत ग्रीसच्या सैन्यात राफेल दाखल होईल

  • Share this:

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : फ्रान्सने ग्रीसशी एक करार केला असून त्याअंतर्गत फ्रान्सकडून ग्रीसला 18 लढाऊ विमानं देण्यात येणार आहेत. या वर्षाच्या शेवटपर्यंत या कराराची कागदपत्रं तयार होतील आणि जून 2021 पर्यंत ग्रीसच्या सैन्यात राफेल दाखल होईल अशी माहिती मीडिया अहवालात पेंटापोस्टेगमाच्या आधारे दिली आहे. ग्रीसने काही दिवसांपूर्वीच हा करार केला असून, 12 सेकंड हँड आणि 6 नव्या राफेल विमानांची मागणी ग्रीसने फ्रान्सकडे केली आहे. या कराराला अनुसरून ग्रीसच्या वायूसेनेचे 6 फायटर पायलट फ्रान्समध्ये जाऊन फायटर विमानासंबंधी प्रशिक्षण घेणार आहेत.

मग प्रश्न उभा राहतो की फ्रान्सने भारताला पहिलं राफेल द्यायला 8 वर्षं लावली आणि ग्रीसला मात्र एका वर्षात राफेल दिलं जाणार आहे, हे कसं काय?  जाणून घ्या काय आहे यामागचे कारण

ग्रीसला प्राधान्य का?

ग्रीस आणि त्याचा शेजारी देश तुर्कस्तान यांच्यात सध्या खूपच तणावाचे संबंध आहेत. या देशांत युद्ध होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी तुर्कींनी लीबियाशी समुद्री संबधाबाबत करार करताना आपला नवा नकाशा प्रसिद्ध केला. त्यामध्ये शेजारी राष्ट्र ग्रीसचा एक भाग दाखवण्यात आला होता. ग्रीसने त्याला आक्षेप घेतला होता. त्यानंतर या वर्षी तुर्कीनी त्या भागात एक टेहाळणी जहाज आणि युद्धनौका तैनात केल्या. त्यामुळे दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला असून, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

समुद्री सीमेवरून ग्रीस आणि तुर्कस्तानमध्ये तणाव

समुद्री सीमेवरून ग्रीस आणि तुर्कस्तानमध्ये तणाव

(हे वाचा-या शहरात बनतंय भारतातील सर्वात मोठं एअरपोर्ट, होणार 29560 कोटी खर्च)

याच काळात ग्रीसने फ्रान्सशी करार करून राफेलची मागणी केली आहे. तुर्कस्तानविरुद्ध युद्ध झाल्यास त्यात राफेल वापरण्याचा ग्रीसचा विचार आहे. ग्रीसला असलेली गरज लक्षात घेऊन फ्रान्सने लवकरात लवकर म्हणजे एका वर्षात राफेल विमान देण्याचं मान्य केलं आहे.

भारताला देण्यात उशीर का?

या प्रक्रियेस फ्रान्स कारणीभूत नसून, भारताची निर्णय प्रक्रिया कारणीभूत आहे. भारताने 2008 मध्ये लढाऊ विमान खरेदीचा विचार सुरू केला. बोईंग, राफेल, टायफून, एफ 21, मिग 35 अशा विमानांचा अभ्यास करून राफेल घेण्याचा निर्णय 2012 मध्ये निश्चित झाला. हळूहळू 2015 मध्ये 36 राफेल जेटचा करार करायचं ठरवलं.2016 मध्ये 60 कोटी रुपयांना 36 विमानं खरेदी करण्याच्या करारावर सह्या झाल्या. 2017 मध्ये भारताला राफेल मिळू शकलं असंत पण त्यानंतर फ्रान्सकडूनही डिलिव्हरीच्या तारखा बदलल्या गेल्या त्यामुळेही उशीर झाला.

(हे वाचा-रोज केवळ 28 रुपये खर्च करून मिळतील 6 फायदे, उपयोगाची आहे LIC ची ही योजना)

2020 मध्ये चीन सीमेवरचा तणाव वाढल्यावर राफेलचा पहिला ताफा भारतात दाखल झाला. एकूण काय तर भारताने करार करण्यात घालवलेला वेळ आणि फ्रान्सने डिलिव्हरी देण्यात केलेली चालढकल यामुळे भारताला राफेल विमानं उशिरा मिळाली. 2023 पर्यंत 36 राफेल विमानं भारतात दाखल होतील अशी अपेक्षा आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 8, 2020, 5:41 PM IST

ताज्या बातम्या