आम्ही IIT-IIMउभारले, तुम्ही दहशतवाद्यांना जन्म घातला,स्वराजांनी पाकला सुनावले

आम्ही IIT-IIMउभारले, तुम्ही दहशतवाद्यांना जन्म घातला,स्वराजांनी पाकला सुनावले

पाकिस्तानची ओळख ही दहशतवाद्यांनी निर्यात करणाऱ्या देशाची झाली आहे. पाकिस्तानची ही ओळख का झाली आहे ? असा सवाल स्वराज यांनी उपस्थितीत केला.

  • Share this:

23 सप्टेंबर : आम्ही आयआयटी, आयआयएम उभारले, तुम्ही लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटना जन्माला घातल्या. हाच पैसा जर तुमच्या नागरिकांवर खर्च केलात, तर ते सुखात राहतील आणि जगातही शांतता नांदेल, अशा थेट शब्दांत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी  पाकिस्तानला खडे बोल सुनावले.

संयुक्त राष्ट्र महासभेच्या 72 व्या सत्रात सुषमा स्वराज यांनी भाषणात पाकिस्तानवर हल्लाबोल केला. स्वराज यांनी पाकिस्तानवर भारताविरोधात युद्ध पुकारण्याचा आरोप केलाय. जो देश विनाश, मृत्यू आणि निर्दयतेचा जगात सर्वात मोठा निर्यातदार आहे आणि हाच देश शांततेच्या व्यासपीठावरून ढोंगीपणाचा चॅम्पियन झाला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांनी गुरुवारी भारतावर मानवाधिकार आयोगाचं उल्लंघन आणि सरकारकडून दशहतवादांचं प्रायोजन केलं जात असल्याचा आरोप केला होता.

सुषमा स्वराज यांनी त्यांच्या विधानाचा चांगला समाचार घेतला. "मी पाकिस्तानच्या नेत्यांना एक प्रश्न विचारते भारत आणि पाकिस्तान सोबत स्वतंत्र झाले. पण दोन्ही देशांची जगात ओळख काय आहे ? भारताची ओळख आज आयआयटीचा महाशक्ती रूपात झाली आहे. तर पाकिस्तानची ओळख ही दहशतवाद्यांनी निर्यात करणाऱ्या देशाची झाली आहे. पाकिस्तानची ही ओळख का झाली आहे ? असा सवाल स्वराज यांनी उपस्थितीत केला.

विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्राच्या सभेत हिंदीतून भाषण केलं. भारतात स्वतंत्र्यानंतर अनेक सरकार आले आणि गेले पण प्रत्येक पक्षाने देशाच्या विकासासाठीच काम केलं. अनेक शैक्षणिक, विज्ञान संस्था स्थापन केल्यात. पण पाकिस्तानने काय केलं फक्त दहशतवाद्यांना पोसलं असा टोला स्वराज यांनी लगावला. भाषणाचा शेवट त्यांनी "सर्वे भवंतू सुखिनः, सर्वे संतू निरामया" म्हणून केला.

First published: September 23, 2017, 11:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading