Home /News /videsh /

कोरोना व्हॅक्सिनसाठी पाकिस्तानला भारतासमोर नमतं घ्यावं लागणार? आहेत हे दोन पर्याय

कोरोना व्हॅक्सिनसाठी पाकिस्तानला भारतासमोर नमतं घ्यावं लागणार? आहेत हे दोन पर्याय

कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी भारत सरकारनं कंबर कसली आहे. त्यावेळी आपल्या शेजारच्या पाकिस्तानला (Pakistan) भारत सरकार हे व्हॅक्सिन देणार का? हा प्रश्न विचारला जात आहे.

    मुंबई, 22 जानेवारी : कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी भारत सरकारनं कंबर कसली आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम (Coronavirus Vaccination Drive) सध्या देशात सुरु आहे. त्याचबरोबर भारतानं बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि मालदीव या शेजारी देशांनाही कोरोना व्हॅक्सिनचे (Covid-19 Vaccine)  लाखो डोस पाठवले आहेत. भारतीय व्हॅक्सिनला जगभर जबरदस्त डिमांड आहे. जवळपास 92 देशांनी भारताकडून कोरोना व्हॅक्सिन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावेळी आपल्या शेजारच्या पाकिस्तानला (Pakistan) भारत सरकार हे व्हॅक्सिन देणार का? हा प्रश्न विचारला जात आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार ‘नेबरहुड फर्स्ट पॉलिसी’ (neighborhood first policy) नुसार भारत सरकार सध्या शेजारच्या तसंच जवळचे मित्र असलेल्या देशांना कोरोना व्हॅक्सिन पाठवत आहे. ‘दैनिक भास्कर’ नं सरकारी सूत्रांच्या माध्यमातून दिलेल्या बातमीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मानवतेच्या आधारावर शेजारी देशांना व्हॅक्सिन देण्याचा निर्णय घेतला आहे. या परिस्थितीमध्ये पाकिस्ताननं भारताकडं व्हॅक्सिनची मागणी केली तर भारत सरकार त्यांची मागणी मान्य करेल. (हे वाचा-‘या’ राज्य सरकारनं दोन वर्षांपासून रोखलं प्रमोशन, सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष) पाकिस्तानकडे दोन पर्याय ‘इंडियन एक्स्प्रेस’ नं दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानला भारताकडून व्हॅक्सिन हवं असेल तर त्यांच्यासमोर दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे इम्रान खान (Imran Khan) सरकारनं याबाबत थेट भारत सरकारकडं मागणी करावी. तर दुसरा पर्याय म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माध्यमातून व्हॅक्सिन घ्यावं. कोवॅक्स या संघटनेच्या माध्यमातून 190 देशांमधील 20 टक्के लोकसंख्येला मोफत व्हॅक्सिन देण्यात येत आहे. पाकिस्तान या संघटनेचा सदस्य आहे. (हे वाचा-कबड्डी स्पर्धेदरम्यान दुर्घटना; मॅच सुरू असतानाच खेळाडूचा मृत्यू) ‘मेड इन इंडिया’ व्हॅक्सिनची मागणी भारत सरकारनं आतापर्यंत बांगलादेशात 20 लाख तर नेपाळमध्ये 10 लाख कोरोना व्हॅक्सिनचे डोस पाठवले आहेत. तर भूतान आणि मालदीव यांना अनुक्रमे दीड लाख आणि एक लाख डोस पाठवून भारतानं मदत केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona vaccine, India, Pakistan

    पुढील बातम्या