पाकिस्तान नव्हे हे तर 'टेररिस्तान'- युएनमध्ये भारताची पाकिस्तानवर टीका

पाकिस्तान नव्हे हे तर 'टेररिस्तान'- युएनमध्ये भारताची पाकिस्तानवर टीका

पाकिस्तानात अनेक दहशतवादी तळ ठोकून आहेत. ओसामा बिन लादेनसुद्धा पाकिस्तानातून पकडला गेला होता. तसंच वैश्वक दहशतवादाला पाकिस्तानाकडून हातभार लावला जातो असंही गंभीर म्हणाल्या.

  • Share this:

22 सप्टेंबर: संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये भारताच्या सचिव इनाम गंभीर यांनी पाकिस्तानला 'टेररिस्तान' म्हणत पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. काश्मिर प्रश्नी पाकिस्तानने भारतावर केलेल्या टीकेला त्या उत्तर देत होत्या.

पाकिस्तानात अनेक दहशतवादी तळ ठोकून आहेत. ओसामा बिन लादेनसुद्धा पाकिस्तानातून पकडला गेला होता. तसंच वैश्वक दहशतवादाला पाकिस्तानाकडून हातभार लावला जातो असंही गंभीर म्हणाल्या. तसंच पाकिस्तानच्या छोट्याशा इतिहासात पाकिस्तानने ही प्रतिमा बनवल्याचं त्यांनी सांगितलं.

याआधी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारत हा त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा धोका असल्याचं सांगितलं होतं. तसंच भारत काश्मिरमध्ये मानव अधिकारांचं उल्लंघन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. भारतापासून तीन युद्धांमध्ये आम्ही स्वत:ला 'वाचवलं' असंही ते म्हणाले. त्याला उत्तर देताना  गंभीर यांनी हे  विधान केलं. तसंच काश्मिर भारताचा अविभाज्य घटक असल्याचं प्रतिपादनही भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत केलं आहे.

First published: September 22, 2017, 10:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading