S M L

मोदी आणि जिनपिंग यांच्या शिखर परिषदेचा दुसरा दिवस, 'या' मुद्द्यांवर केली चर्चा

पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्या शिखर परिषदेचा आजचा दुसरा दिवस. सीमेवर शांतता राखायला हवी, आणि मतभेद हे चर्चेद्वारेच सोडवायला हवेत, हे दोन्ही नेत्यांनी पुन्हा बोलून दाखवलं.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 28, 2018 01:36 PM IST

मोदी आणि जिनपिंग यांच्या शिखर परिषदेचा दुसरा दिवस, 'या' मुद्द्यांवर केली चर्चा

28 एप्रिल : पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्या शिखर परिषदेचा आजचा दुसरा दिवस. सीमेवर शांतता राखायला हवी, आणि मतभेद हे चर्चेद्वारेच सोडवायला हवेत, हे दोन्ही नेत्यांनी पुन्हा बोलून दाखवलं.

मोदींचा आजचा दिवस सुरू झाला तो जिनपिंग यांच्यासोबत ईस्ट लेकच्या भोवती फेरफटका मारून. त्यानंतर दोघांनी बराच वेळ नैकानयन केलं. नौकेवरच त्यांचं चहापानही झालं. चीनमध्ये टी-टेस्टिंग नावाचा एक प्रकार आहे. विविध प्रकारचे चहा थोड्या प्रमाणात चाखले जातात. त्याचा अनुभवही मोदींनी घेतला. दोन्ही नेत्यांमध्ये अनेक हलकेफुलके क्षणही आले.. दोघांमधली केमिस्ट्री दिसून येत होती.

मोदी-जिनपिंग शिखर परिषदतले प्रमुख मुद्दे

- सीमेवर शांतता राखणं गरजेचं

- शांततापूर्ण चर्चेनं मतभेद सुटले पाहिजेत

Loading...
Loading...

- मतभेद सोडवण्यासाठी लागणारी हुशारी आणि परिपक्वता दोन्ही

देशांमध्ये आहे

- एकमेकांच्या आकांक्षा, चिंता आणि संवेदनांचा आदर केला जाईल

- संबंध शांततापूर्ण, स्थिर आणि संतुलित हवेत यावर एकमत

- दोन्ही देशांमधला व्यापार संतुलित हवा, हा मुद्दा अधोरेखित

- भारताकडून कृषी आणि औषध क्षेत्रातली निर्यात वाढवता येईल,

मोदींची सूचना

- दोन्ही देशांमधल्या अंतर्गत मुद्द्यांवरही चर्चा

- जागतिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा

- उभय देशांच्या नागरिकांमधला संवाद वाढायला हवा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2018 01:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close