चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात मराठी माणसं आघाडीवर; Network18 च्या सर्व्हेमधून ट्रम्प की जिनपिंगचंही मिळालं उत्तर

चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात मराठी माणसं आघाडीवर; Network18 च्या सर्व्हेमधून ट्रम्प की जिनपिंगचंही मिळालं उत्तर

सध्या भारत-चीन दरम्यानच्या सीमेवर तणाव वाढत असताना सर्वसामान्य भारतीयांमध्ये चीनविषयी काय भावना आहेत, हे जाणून घेण्यासाठी Network18 ने त्यांच्या डिजिटल व्यासपीठांवर एक सर्वेक्षण केलं.

  • Share this:

मुंबई, 5 जून : सध्या भारत-चीन दरम्यानच्या सीमेवर तणाव वाढत असताना सर्वसामान्य भारतीयांमध्ये चीनविषयी काय भावना आहेत, हे जाणून घेण्यासाठी Network18 ने त्यांच्या डिजिटल व्यासपीठांवर एक सर्वेक्षण केलं. त्यामध्ये 80 टक्के  भारतीयांना चीन मैत्रीच्या लायकीचा देश वाटत नसल्याचं उघड झालं आहे. चीन प्रामाणिक नसल्याने मैत्री करू नये असं या 80 टक्के जनतेला वाटतं.

वेगवेगळ्या 13 भाषांच्या वाचकांमध्ये आणि 16 वेबसाइट्सवर हा सर्व्हे घेण्यात आला.

News18lokmat.com सह News18, Moneycontrol, Firstpost and CBNC-TV18 या वेबसाइट्सवर हा सर्व्हे घेण्यात आला. त्याला 31000 हून अधिकांनी प्रतिसाद दिला. मराठी माणसाला चीनविषयी सर्वाधिक तिरस्कार असल्याचं या सर्व्हेतून दिसून आलं.

चिनी वस्तूंवर बहिष्काराला पाठिंबा आहे का याचं उत्तर 97 टक्के मराठी लोकांनी हो असं दिलं आहे. त्यातल्या त्यात कमी पाठिंबा पंजाबी लोकांनी दिला आहे. 78% पंजाबी वाचक चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यास तयार आहेत.

चीनला दणका! भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान झाला नवा लष्करी करार

ट्रम्प की क्षी जिनपिंग या प्रश्नावर 98 टक्के मराठी जनतेनं अमेरिकन अध्यक्षांच्या पारड्यात वजन टाकलं आहे. फक्त मल्याळी आणि उर्दू भाषिक भारतीयांना त्यातल्या त्यात जास्त मतं चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना दिली आहेत.

या सर्व्हेमध्ये चीनविषयी 21 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी एक प्रश्न होता - चीन पाकिस्तानचा समर्थक आहे असं वाटतं का. यावर शंभर टक्के भारतीयांनी हो असं उत्तर दिलं आहे.

COVID-19चा उगम चीनमध्ये झाला याची 84 टक्के भारतीयांना माहिती आहे.

त्याचबरोबर  91 टक्के भारतीयांना चीनने कोरोनाव्हायरससंदर्भातली खरी माहिती उघड केलेली नाही, असंही वाटत आहे.

भारतात 5G सेवांसाठी चिनी कंपन्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी परवानगी देऊ नये असं 84 टक्के जनतेला वाटतं.

तिबेट, शिंजियांग आणि अंतर्गत मंगोलियाचं स्वातंत्र्याच्या मागणीला भारताने पाठिंबा द्यावा असं 50 टक्के भारतीयांना वाटतं. पण 35 टक्के भारतीयांनी यावर सांगता येत नाही, असं उत्तर दिलं आहे.

अन्य बातम्या

कोरोना लॉकडाऊनमुळे झालं ब्रेकअप; पुन्हा पॅचअप करायचंय? मग तुमच्यासाठी टीप्स

Unlock 1: दुकाने उघडण्यासंदर्भातील प्रशासनाची 'ती' ऑर्डर गोंधळात टाकणारी

पंतप्रधान ठरले सुपरहिट! नरेंद्र मोदींच्या 4 मास्टरस्ट्रोकमुळे चीनने घेतली माघार

First published: June 5, 2020, 8:52 PM IST
Tags: Network18

ताज्या बातम्या