S M L

मृत्यूनंतरही वडील मुलीच्या वाढदिवसाला पाठवतायत पुष्पगुच्छ!

अमेरिकेत राहणारी बेली सेलर्स. वयाच्या 16व्या वर्षी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला कॅन्सरनं. पण बेलीला तिच्या प्रत्येक वाढदिवसाला वडिलांकडून पुष्पगुच्छ आणि शुभेच्छापत्र मिळतंय.

Sonali Deshpande | Updated On: Nov 30, 2017 04:07 PM IST

मृत्यूनंतरही वडील मुलीच्या वाढदिवसाला पाठवतायत पुष्पगुच्छ!

30 नोव्हेंबर : अमेरिकेत राहणारी बेली सेलर्स. वयाच्या 16व्या वर्षी तिच्या वडिलांचा मृत्यू  झाला कॅन्सरनं. पण बेलीला तिच्या प्रत्येक वाढदिवसाला वडिलांकडून पुष्पगुच्छ आणि शुभेच्छापत्र मिळतंय.

यावर्षी बेलीचा 21वा वाढदिवस. त्यावेळचं वडिलांचं पत्र तिनं ट्विट केलंय. हे शेवटचं पत्र. मृत्यूआधी वडिलांनी आपल्या मुलीला प्रत्येक वाढदिवसाला बुके मिळेल, असं अॅडव्हान्स बुकिंग करून ठेवलं होतं. तिच्या 21व्या वाढदिवसापर्यंत ही फुलं मिळणार होती.

बेलीनं आपल्या वडिलांचं पत्र ट्विट केलंय. पत्र अगदी मनाला स्पर्श करून जातं.

ते म्हणतात,  "आपण पुन्हा भेटत नाही, तोपर्यंत हे माझं शेवटचं पत्र. माझ्या लाडक्या मुली तुझ्या डोळ्यात एकही अश्रू मी पाहू शकणार नाही. मला मिळालेल्या अनमोल गोष्टींमधली तू सर्वात अनमोल आहे. माझी अशी इच्छा आहे की तू नेहमी आपल्या आईचा आदर कर. स्वत:शी प्रामाणिक रहा. आनंदी रहा आणि आयुष्य आनंदाने जग. आयुष्यातल्या तुझ्या प्रत्येक आव्हानांमध्ये मी तुझ्या सोबत असेन. आय लव्ह यू. वाढदिवसाच्या शुभेच्छा. "

बेलीनं स्वत:चा आणि वडिलांचा फोटो ट्विट केलाय. याला जवळजवळ साडेतीन लाख ट्विटस् आणि 14 लाख लाईक्स मिळाल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 30, 2017 04:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close