ही कसली क्रेझ, जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार; कोरोना अजून काय काय दाखवणार!

ही कसली क्रेझ, जीवंतपणीच करवून घेतले स्वत:वर अंत्यसंस्कार; कोरोना अजून काय काय दाखवणार!

धक्कादायक म्हणजे यासाठी महिलेने तब्बल 75 हजार रुपये खर्च केले आहेत.

  • Share this:

काही काही घटना अशा असतात ज्या पाहिल्यावर वाटतं की आपलं जग असं का आहे? गेल्या काही दिवसात अशीच एक घटना समोर आली आहे. जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. चिलीमध्ये एका महिलेने स्वत:च्याच अत्यंसंस्काराचं आयोजन केलं.

एका रिपोर्टनुसार या महिलेने आपल्या फेक अंत्यसंस्कारासाठी 710 पाऊंड्स म्हणजे तब्बल 75 हजार रुपये खर्च केले. 59 वर्षांच्या मायरा अलोंजो सँटियागो शहरात राहते. गेल्या काही दिवसात कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्काबाबत विचार करीत असताना ही कल्पना तिच्या डोक्यात आली. यानंतर तिने आपल्या अंत्यसंस्काराची रिहर्सल करण्याचा विचार केला, इतकच नाही महिलेने आपल्या मित्र-मैत्रिणींनाही यासाठी तयार केलं.

मायरा यादरम्यान ताबूतमध्ये काही तासांसाठी झोपून राहिली. तिच्याजवळ तिचे कुटुंबीय आणि मित्रांनाही खोटं खोटं रडावं लागलं. काही लोक यादरम्यान फोटोही काढत होते. एखाद्या खऱ्या खुऱ्या अंत्यसंस्काराप्रमाणे हा सर्व प्रकार पार पडला. तिने ताबूतमध्ये झोपताना पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता आणि नाकात कापूनही घातला होता. अंत्यसंस्कारा दिवशी केले जाणारे सर्व विधी यादिवशी पार पडले.

हे ही वाचा-नेमकं घडतंय काय! वर्षभरापासून फ्रिजरमध्ये स्टोर आहेत 750 कोरोना रुग्णांचे मृतदेह

मायरा यासर्व प्रकाराबाबत म्हणाली की, आता मृत्यूनंतर तिला कोणत्याही अंत्यसंस्काराची गरज नाही. कारण जिवंतपणीच तिने सर्व पाहिलं आहे. मायरा पुढे म्हणाली की, कोरोनामुळे ज्या प्रकारे लोकांचा मृत्यू होत आहे, त्यानंतर हा निर्णय घेतला. दुसरीकडे काहींनी मात्र मायराच्या या निर्णयावर टीका केली, आणि सांगितलं की, असं करून मायरा कोरोना व्हायरसमध्ये मृत्यू झालेल्यांचा थट्टा करीत आहे, जी अत्यंत चुकीचं आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: May 13, 2021, 3:12 PM IST

ताज्या बातम्या