Home /News /videsh /

कोरोनामुळे या देशात अजबच घडलं, सिंह करताहेत रस्त्यावर आराम!

कोरोनामुळे या देशात अजबच घडलं, सिंह करताहेत रस्त्यावर आराम!

रस्ते मोकळे असल्याने वाहनांची वाहतूक नाही. आवाज नाहीत. गोंगाट नाही. त्यामुळे प्राण्यांना मुक्त संचार करत येतो

  जोहान्सबर्ग 16 एप्रिल: लॉकडाऊनचं पालन व्हावं यासाठी मॉस्कोमध्ये रस्त्यावर सिंह सोडल्याची अफवा आणि फोटो काही दिवसांपूर्वी पसरली होती. ते फोटो खोटे असल्याचं सिद्ध झालं होतं. सिंहांचा एक कळप चक्क रस्त्यावर आराम करत असल्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र हे फोटो फेक नाहीत तर अगदी खरे आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या क्रृगर नॅशनल पार्कमधले हे फोटो आहेत. वन्य प्राण्यांसाठी दक्षिण आफ्रिकेतली जंगलं प्रसिद्ध आहेत. तिथलं प्राणी वैभव पाहण्यासाठी जगभरातले पर्यटक दक्षिण आफ्रिकेत येत असतात. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सगळ्या जगातले व्यवहार थंडावले आहेत. हवाई वाहतूक बंद आहे. त्यामुळे कायम ओसंडून वाहणारे सगळे पार्क सध्या बंद आहेत. रस्ते मोकळे असल्याने वाहनांची वाहतूक नाही. आवाज नाहीत. गोंगाट नाही. त्यामुळे प्राण्यांना मुक्त संचार करत येतो. क्वचितच दिसणारे अनेक प्राणी मुक्तपणे विहार करताना दिसत आहेत. क्रृगरच्या प्रशासनाने असेच काही फोटो आपल्या ट्विटर हँडवरवरून ट्विट केले आहेत. त्यात सिंहांचा एक कळप अगदी निवांतपणे पार्कमधल्या रस्त्यांवर आराम करत करत असताना दिसतो आहे. असं दृष्य पर्यटकांना कधीच बघायला मिळत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. हे वाचा...

  गर्भवती महिलेला मिळाली नाही Ambulance, पोलिस जीपमध्ये दिला मुलाला जन्म

  Air Forceच्या ‘अपाचे’ हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, पाक सीमेजवळ  थरार

  Published by:Priyanka Gawde
  First published:

  पुढील बातम्या