News18 Lokmat

पाकिस्तानी महिला पत्रकाराचं अपहरण आणि सुटका

पाकिस्तानच्या सैन्यावर टीका करणाऱ्या ५२ वर्षीय गुल बुखारी यांचं अज्ञातांनी अपहरण केलं होतं. सोशल मीडियावर या अपहरणासाठी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला जबाबदार धरण्यात येत होतं, त्यानंतर काही तासांतच त्या घरी सुखरुप परतल्या आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2018 01:05 PM IST

पाकिस्तानी महिला पत्रकाराचं अपहरण आणि सुटका

कराची, 06 जून : पाकिस्तानी महिला पत्रकार गुल बुखारी मंगळवारी रात्री उशिरा घरी परतल्या. पाकिस्तानच्या सैन्यावर टीका करणाऱ्या ५२ वर्षीय गुल बुखारी यांचं अज्ञातांनी अपहरण केलं होतं. सोशल मीडियावर या अपहरणासाठी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला जबाबदार धरण्यात येत होतं, त्यानंतर काही तासांतच त्या घरी सुखरुप परतल्या आहेत. महिला पत्रकाराच्या कुटुंबियांनी यासंबंधित तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुल बुखारी या रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या कार्यक्रमासाठी 'वक्त टीव्ही'मध्ये जात होत्या. या दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी लाहोर कॅंटजवळ अडवली आणि त्यांचं अपहरण केलं. दोन अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची माहिती त्यांच्या गाडी चालकाने कुटुंबियांना आणि पोलिसांना दिली.

त्यानंतर गुल बुखारी यांचं अपहरण झाल्याचं वृत्त सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं आणि गुप्तचर यंत्रणांनीचं त्यांचं अपहरण केल्याचा आरोप युजर्सकडून करण्यात येत होता. त्यानंतर अपहरणाच्या अवघ्या तीन तासांमध्येच त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. गुल बुखारी या पाकिस्तानी सैन्यावर सातत्याने टीका करत असतात, लष्कराने राजकारणात हस्तक्षेप करण्यासही त्या विरोध करत होत्या. मात्र, त्यांचं अपहरण कोणी केलं होतं याबाबत माहिती मिळालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2018 01:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...